गोवा 

पेडण्यात भाजपची आघाडी; मगो, आपमध्ये सामसूम

पेडणे ​(​निवृत्ती शिरोडकर​) :
विधानसभा निवडणुका सहा महिन्यावर य्रेवून राहिल्या आहेत. या निवडणुकीत पुन्हा एकदा पेडणे तालुक्यातील मांद्रे आणि ​​पेडणे या दोन्ही मतदार संघात भाजपच्या गट समित्या कार्यरत झाल्या आहेत, या समित्या केवळ निवडणुका पुरती कार्यरत नसतात तर वर्षाचे बाराही महिने भाजपच्या समित्या कार्यरत असतात.

पेडणे मतदारसंघ​​
पेडणे मतदार संघातील भाजपची मंडळ समिती चांदेलचे पंच सदस्य तुळसीदास गावस यांच्या नैतृत्वाखाली कार्यरत आहे त्यांनी जबरदस मतदार संघात भाजपची ताकत तयार केली आहे. जे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांना शक्य होत नाही त्या कार्यकर्त्याना संघटीत करण्याचे काम तुळसीदास गावस अविरतपणे करत आहेत . तर दुसऱ्या बाजूने विरोधी पक्षाच्या मगो, कॉंग्रेस ,शिवसेना आणि गोवा फॉरवर्ड या पक्षाच्या समित्यांमध्ये सर्वत्र सामसूम आहे. कॉंग्रेस वगळता मगो, गोवा फॉरवर्ड आणि शिवसेना या मतदार संघ समित्या अजून पर्यंत निवडलेल्या नाही. तर कॉंग्रेसने नुकतीच रुद्रेश देशप्रभू यांच्या अध्यक्षतेखाली समिती निवडलेली आहे. मगो पक्षाची समिती निवडली नसली तरीही मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी आपल्या कार्याचा वैयक्तिकरित्या जबरदस्त जनसंपर्क चालवलेला आहे.

मांद्रे मतदारसंघ
मांद्रे मतदार संघातील भाजपा मंडळ समिती मधु  परब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असतानाच शेतकरी मोर्चा, महिला मोर्चा या विविध भाजपाच्या समित्या कार्यरत आहे., कॉंग्रेसची समिती आनंद शिरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. हि समिती सचिन परब यांच्या कार्याला वाहून घेत असल्याचे दिसून येते. भाजपच्या समितीना टक्कर देणाऱ्या विरोधी पक्षाच्या समित्या कुचकामी ठरत आहे. कॉंग्रेसचे आनंद शिरगावकर कार्यरत आहे, मात्र त्याना योग्य ती इतरांची साथ मिळत नाही.

मगो , आम आदमी व गोवा फॉरवर्ड  सामसूम
आम आदमी पक्षाचे नेते प्रसाद शहापूरकर, मगोचे जीत आरोलकर आणि गोवा फॉरवर्डचे दीपक कलंगुटकर हे नेते आपल्या पद्धतीने कार्य करत आहेत. मात्र निवडणुका जवळ आल्यातरी या नेत्यांच्या पक्षाने अजूनपर्यंत आपापल्या समित्या कार्यरत केल्या नाहीत त्यामुळे सध्यातरी समितीच्या बाबतीत भाजपचे जसे पेडणे आणि मान्द्रेतही वर्चस्व आहे.

पेडणे मतदार संघात भाजपाचे मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस यांनी जबरदस्त भाजपची ताकत या मतदार संघात वाढवलेली आहे. स्वता वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करून जे काही कार्यकर्त्ये बाबू आजगावकर यांच्यावर नाराज आहे. त्याना पक्षाकडे वळवण्याचा त्यांनी जोरदार प्रयत्न केला आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर प्रत्येकवेळी जाहीरपणे सांगतात कि आपल्याला पक्ष महत्वाचा नाही म्हणून आपण विकासाला महत्व देवून सत्येसाठी पक्षाचा त्याग केल्याचे ते सांगतात, मात्र भाजपाचे मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस यांनी पूर्ण मतदार संघात भाजपच्या कार्यकर्त्याना संघटीत करण्याचे काम सुरु केले आहे. शिवाय भाजपा युवा मोर्चा किसान मोर्चा, महिला मोर्चा याही समित्या कार्यरत आहे.

मगोची समिती नसली तरीही प्रवीण आर्लेकर यांच्या नैतृत्वाखाली कार्य जोमाने सुरु आहे, शिवाय मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनीही वैयक्तिक पातळीवर आपले कार्य सुरु केले आहे. मात्र गोवा फॉरवर्ड, आम आदमी या दोन्ही पक्षाच्या समित्या अजून निवडलेल्या नाहीत शिवाय नुकतीच कॉंग्रेसची गट समिती जाहीर विठू मोरजकर यांनी केली आहे. मात्र भाजपला टक्कर देण्याऱ्या विरोधी पक्षाच्या गत समित्या सक्रीय नाही हे चित्र पहावयास मिळत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: