क्रीडा-अर्थमत

‘एसबीआय लाइफ’ने सादर केली ‘ईशील्ड नेक्स्ट’ योजना

मुंबई :
देशातील सर्वात विश्वासार्ह खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स’ने आज ‘एसबीआय लाइफ ईशील्ड नेक्स्ट’ ही एक अनोखी नवीन युगाची विमा संरक्षण योजना सुरू करीत असल्याची घोषणा केली. विमाधारकाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये त्याचे विम्याचे संरक्षण वाढविण्याची तरतूद या योजनेमध्ये आहे. ही एक वैयक्तिक, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपिंग, शुद्ध जोखीम पेलणारी, प्रीमिअम स्वरुपाची आयुर्विमा पॉलिसी आहे. ग्राहक आपल्या आयुष्यातील उत्कृष्ट क्षणांचा आनंद घेत असताना, त्यांना आवश्यक असणारे विमा संरक्षण ‘लेव्हल अप’ करण्याचे (समतल पातळीवर नेण्याचे) काम या पॉलिसीत केले जाते. विमाधारकाचा विवाह, त्याची पालकत्व प्राप्ती, किंवा त्याची नवीन घरखरेदी, अशा त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांशी या पॉलिसीतील विमाराशीची वाढ जोडलेली असते.

‘लेव्हल अप’ हे ‘ईशील्ड नेक्स्ट’ या नवीन युगातील संरक्षण योजनेचे अनोखे वैशिष्ट्य आहे. ‘लेव्हल कव्हर’, ‘इन्क्रीजिंग कव्हर आणि ‘लेव्हल कव्हर विथ फ्युचर प्रूफिंग बेनिफिट’ अशा तीन पर्यायांमध्ये ते उपलब्ध आहे. प्रत्येक ग्राहकाच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते विचारपूर्वक तयार केले गेले आहे.

  • पर्याय 1 – ‘लेव्हल कव्हर’ लाभ – येथे पॉलिसीच्या कालावधीत संपूर्ण विमाराशी स्थिर राहते.
  • पर्याय 2 – ‘इन्क्रीजिंग कव्हर’ – या पर्यायामध्ये, विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना मिळावयाची पूर्ण रक्कम विमाराशीच्या 10 टक्के प्रतिवर्ष या (साध्या) दराने पॉलिसीच्या प्रत्येक 5 व्या वर्षाच्या अखेरीस वाढते.
  • पर्याय 3 – ‘लेव्हल कव्हर विथ फ्युचर प्रूफिंग बेनिफिट’ – विवाह, पालकत्व प्राप्ती किंवा घरखरेदी यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांवर विम्याचे कवच वाढविण्याची निवड या पर्यायातून ग्राहकांना मिळते. हा पर्याय स्वीकारल्यास, ग्राहकांना नंतर प्रत्येकवेळी वैद्यकीय चाचण्या कराव्या लागत नाहीत.

‘एसबीआय लाइफईशील्ड नेक्स्ट’च्या सादरीकरणाबाबत भाष्य करताना ‘एसबीआय लाईफ इन्शुरन्स’चे प्रेसिडेंट रवी कृष्णमूर्ती म्हणाले, “आपण सर्वजण अत्यंत अनिश्चित काळात जगत आहोत. आपल्या गरजा आणि प्राधान्यक्रम काळाबरोबर बदलत राहतात. त्यामुळे आपल्या सतत विकसीत होणाऱ्या गरजांशी आपला विमा जुळलेला असणे महत्त्वाचे आहे. आपण जीवनात जसजशी प्रगती करतो, तसतसा आपला मुदत विमा बुद्धिमान पद्धतीने आपल्या गरजांची काळजी घेण्यास सक्षम असावा; कारण त्यावेळी आपण जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पे पार करीत असतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, आपला ‘टर्म इन्शुरन्स’ आपल्याप्रमाणेच “लेव्हल अप” करण्यास सक्षम असावा. ‘एसबीआय लाइफईशील्ड नेक्स्ट’ नेमके तेच करते. हा एक आर्थिक संरक्षणाचा उपाय आहे. सध्याच्या वेगवान व अनिश्चित काळात आपल्या वर्तमानातील व भविष्यातील गरजांचे रक्षण या पॉलिसीमुळे होते.”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: