गोवा 

नगरसेविका अश्विनी पालयेकर रंगल्या ‘गणेशरंगात’

पेडणे [ निवृत्ती शिरोडकर] :

आजची स्त्री कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. उलट पुरुषांच्या चार पाऊले पुढे आहेत. यांचे ताजे उदाहरण म्हणजे पेडणे पालिकेची नगरसेविका आश्विनी अरुण पालयेकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. चार भिंतीच्या आड न राहता, मुलाबाळांचे शिक्षण, घरसंसार व्यवस्थित करून आणि समाजाचे ऋण फेडण्यासाठी पालिकेच्या निवडणुकीतही विजयी होवून आपल्या प्रभागाचा विकास करत असतानाच आपल्या अंगातील कला चार चौघात पोचावी यासाठी त्या आजची आपल्या चित्रशाळेत वेळात वेळ काढून गणेश मुर्त्या रंगवण्याचे काम करत असतात.

खारेबंद पेडणे येथील पालयेकर कुटुंबियांची शेकडो वर्षाची परंपरा असलेली गणेश मूर्ती चित्र शाळा हि गांधी तीर या ठिकाणी पुरातन वास्तू मध्ये  शाळा आहे. याच इमारतीला १०० वर्षापेक्षा जास्त काळ झाला त्या काळापासून या वास्तूमध्ये राज्यात आणि बाहेर राज्यात घरोघरी आणि सार्वजनिक गणेशमुर्त्या बनवण्याचे काम सुरु आहे.

पालयेकर बंधूंची हि चित्रशाळा पूर्ण पेडणे तालुक्यात परिचित आहे. शेकडो वर्षांच्या परंपरा जसे पुरुष मंडळी राखतात त्याच प्रमाणे स्त्रियाही या कलेत रमून आपली कला चार चौघात सादर करायला मागेपुढे पाहत नाही.

नगरसेविका आश्विनी अरुण पालयेकर यांच्याशी संवाद साधल्यानंतर आश्विनी म्हणते आपण मागच्या २० वर्षापासून गणेशमुर्त्या रंगवण्याचे काम करते, मुर्त्याना कसा रंग भरावा याविशयी आपले पती अरुण पालयेकर, दीर यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. गणेशमूर्ती ना रंग देताना जो आनंद मिळतो तो आणखी कोणत्याही कलेत मिळत नाही, आपण रंगवलेल्या मूर्ती घरोघरी त्याचे पूजन करून कलेचा हा एक वेगळाच सन्मान असल्याचे त्या म्हणतात.

पर्यावरणाला साथ देणाऱ्या मुर्त्या आमच्या चित्र शाळेत मागच्या १०० वर्षापेक्षाही जास्त काळानुसार चालू आहे. त्यात आजपर्यंत खंड पडला नाही. सामाजिक शेत्रात कार्य करत असताना आपल्या प्रभागातील काही महिला नागरिक आपापल्या समस्या व सार्वजनिक समस्या घेवून येतात त्या समस्या ऐकून घेवून त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करत आहे.

चित्रशाळेत मुर्त्या रंगवत असतानाच इतर कामाकडे आपण लक्ष देते, सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी घरच्या मंडळींचे वेळोवेळी सहकार्य मिळत आहे.

कोरोनाच्या महामारीत सर्व मातीचे रंगाचे आणि मातीचे  भाव वाढल्याने गणेश भक्ताना त्यांचा आर्थिक फटका बसणार नाही याची काळजी व्यावसायिक म्हणून नव्हे तर कलाकार म्हणून घ्यावी लागत असल्याचे मत आश्विनी पालयेकर यांनी व्यक्त केली.

आश्विनी पालयेकर म्हणते आपला मुलगा कृष्णा पालयेकर हे सामाजिक कार्य करतात त्यांचा मला अभिमान आहे, माणुसकीचा झरा त्याच्यातही वर्षाचे १२ बाराही महिने वाहत असल्याचे दिसते, त्यांच्या सारख्या मुलाला जन्म देणे म्हणजे आईपणाला धन्यता आहे, कला जोपासत असताना कलाच आपल्याला आपल्याकडे वळवत असते, आवड असली कि सवड काढून कलेला वेळ द्यावाच लागतो.

आजची मुल मातीत हात घालत नाही, असे म्हणतात परतू आमच्या चित्रशाळेत अनेक मुले आवड म्हणून मातीत हात घालून मूर्तीला आकार देण्याचा प्रयत्न करतात, आज काल आई वडील आपल्या मुलाना मातीत हात घालायला देत नसल्याने काही मुले मातीत हात घालत नाही. आई वडिलांनी मुलांची आवड ओळखून त्याना जर मार्गदर्शन केले तर ती मुले नक्कीच या कलेत प्राविण्य मिळवू शकतात.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: