गोवा 

‘गोव्याचे, देशाचे नाव मोठे करण्यासाठी पेडणेकरांनी योगदान द्यावे’

पेडणे  (निवृत्ती शिरोडकर) :
श्री भगवती देवीच्या  कृपने आपण हिमाचल प्रदेशचा राज्यपाल म्हणून त्या पदावर पोचलो. देवीची इच्छा होती आपण देशसेवेचे कार्य करावे यासाठी आपण तिथे पोचलो असून पेडणेकरांनी जे प्रेम आणि सहकार्य केले त्यामुळेच व्यापक देशसेवा करावी ही तिची इच्छा आहे असे प्रतिपादन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकरजी यांनी पेडणे येथे श्री भगवती देवीचे दर्शन घेतल्यानंतर पञकारांकडे बोलताना केले.

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून निवड झाल्यानंतर राजेंद्र आर्लेकर हे प्रथमच श्री भगवती देवीचे दर्शन घेण्यासाठी  पेडणेत आले. यावेळी देवस्थानचे पदाधिकारी जगन्नथ देसाई यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष विनोद सावळ , श्रीधर शेणवी देसाई, माजी नगराध्यक्ष स्मिता कुडतरकर, माजी उपनगराध्यक्ष उपेंद्र देशप्रशू, माजी उपनगराध्यक्ष गजानन  सावळ देसाई, माजी सरपंच सीताराम परब, पेडणे अग्निशामक दलाचे अधिकारी प्रशांत धारगळकर, माजी सरपंच रुपेश परब, चंद्रकांत सांगळे, उदय कुडतरकर , चंद्रकांत सावळ देसाई,  प्रियंका कुडतरकर , संतोष शेटगावकर, गिरीश कामत आदीनी राज्यपाल यांचे स्वागत केले.

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर म्हणाले की,  देवीच्या कृपेने इथे आलो.  पेडणेकरांची सेवा करण्याची संधी दिली.आता  देशाची व्यापक सेवा करण्याची तिची इच्छा आहे , म्हणून  मला तिथे पाठविले. सामाजिक विषयांसाठी पेडणेकरांनी योगदान द्यावे असे सांगून यंदा स्वतंञ्याचे ७५ वर्ष आहे .यासाठी  देशसेवेसाठी आपण काय योगदान देऊ शकतो ते पहावे व त्याप्रमाणे कार्य करावे असे आवाहन केले.   सुरुवातीला आपण गोंधळून गेलो .माञ गोव्यातील विशाल समुद्राची खोली आणि तिथे गेल्यानंतर हिमालय पर्वंत यांची उंची पाहिली  या दोघांचा समन्वय साधण्याचा आपणास देवाने संधी दिल्याचे आर्लेकर म्हणाले.

यावेळी पञकारांनी गोव्यातील जनतेची आणि पेडणेकरांची आठवण येते का असा प्रश्न  विचारले असता आर्लेकर म्हणाले पेडणेकरांनी मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली.आणि प्रेम दिले याची आठवण येते.
यावेळी मंदिरातील पुरोहितानी देवीला साकडे घालून आर्लेकर यांच्या आरोग्य चांगले रहावे असे साकडे घातले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: