गोवा 

‘मोरजी मंडळाने संघटीत ​होऊन ​काम करावे’

​​पेडणे ​(निवृत्ती शिरोडकर​) :
​​मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाने अल्पकाळात जी भरारी घेतलेली आहे, ती अखंडित ठेवण्या​​साठी सर्व सदस्यांनी संघटीत होवून काम करावे, जर आपसात मतभेद असतील तर एका ठिकाणी येवून त्यावर चर्चा करावी, नाक्यावर करू नये, उत्सवाबरोबरच सामाजिक उपक्रम राबवत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून प्रगतीचा आलेख असाच ठेवण्याचे आवाहन मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर यांनी मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाच्या देणगी कुपनचा शुभारभ केल्यानंतर केले.

२२ रोजी मोरजी श्री कळस देव मांगर मोरजी येथी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सरपंच वैशाली शेटगावकर, मोरजाई देवस्थान अध्यक्ष गोपाळ शेटगावकर, उपसरपंच अमित शेटगावकर, पंच विलास मोरजे, पंच मुकेश गडेकर, पंच तुषार शेटगावकर, मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ अध्यक्ष नाना उर्फ चन्द्रो दाभोलकर, उत्सव समितीचे अध्यक्ष देवानंद गावडे, देणगी कुपन अध्यक्ष दीपक शेटगावकर आदी उपस्थित होते.

प्रकाश आजगावकर, नितीन शेटगावकर, सुर्यकांत पेडणेकर,संतोष शेटगावकर, सुनील शेटगावकर, दादी शेटगावकर, श्रीकृष्णा आस्कावकर आदींनी पाहुण्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. पाहुण्याच्या हस्ते देणगी कुपनचा शुभारंभ करण्यात आला.

जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर यांनी बोलताना मोरजाई देवस्थान समितीने मंडळाला उत्सव साजरा करण्यासाठी तोंडी जागा दिलेली आहे, तसा कोणताही करार झाला नाही, परंतु मंडळाने सर्वांच्या सहकार्याने सुंदर सभाग्रह उपलब्ध करून चांगली सोय केली आहे. हे कार्य असेच चालू ठेवण्याचे आवाहन केले.

मोरजाई देवस्थान समितीचे अध्यक्ष गोपाळ शेटगावकर यांनी बोलताना गणेश उत्सवातून सर्व समाजाचे नागरिक सहभागी होवून एकोपा वाढत असतो. उत्तरोत्तर देवाची सेवा घडत राहण्याची सदिच्छा व्यक्त केली.

मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर यांनी बोलताना देणगी कुपन साठी भक्तांनी मोठ्या संख्येने खरेदी करून मंडळाला सहकार्य करण्याचे आवाहन केले, कोरोनाचे सावट असल्याने मोठ्या कार्यक्रमावर परिणाम  होणार आहे, सरकारी नियम पाळून उत्सव साजरा करण्याचे आवाहन करून अल्पकाळात मंडळाने भरारी घेतलेली आहे.

स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिप्तेश हळर्णकर यांनी केले. सचिव निवृत्ती शिरोडकर यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: