सातारा 

जिल्हा बॅंक शाखेच्या घोटाळ्यावर अध्यक्ष काय भूमिका घेणार? 

अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

​​सातारा ​(महेश पवार) :
जिल्ह्यातील शेतकर्याची अर्थ वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काही शाखेतील घोटाळ्यामुळे बॅक चांगलीच चर्चेत आली , कण्हेर खेडच्या विकास सेवा सोसायटी सचिव बजरंग केंजळे याने  बोगस दाखले देत स्वतं: च सोसायटी चे कर्ज असताना देखील अन्य बॅंकेतून कर्ज काढत फसवणूक केली , यावरच न थांबता सचिव बजरंग केंजळे नी कण्हेर खेड च्या सोसायटीत देखील गाव पुढार्याना कर्ज घेण्यासाठी बेकायदेशीर कर्ज दिलं व कर्ज नसल्याचे दाखले देण्याचे काम वर्षानुवर्षे करून घोटाळा केला . या संदर्भात, सहकार आयुक्त, महाराष्ट्रराज्य, जॉईंट रेजिस्ट्रार, कोल्हापूर, तहसीलदार, कोरेगाव, व चौकशी कार्यालय कोरेगाव तालुका सहाय्यक निबंधक यांनी वेळोवेळी बँकेला ( केडर प्रमुख, विशेष कार्यकारी अधिकारी ) जिल्हा उप निबंधक यांनी कारवाई करण्याचे आदेश देऊन देखील जिल्हा बॅक प्रशासन कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवत नसल्यानं बॅंकेच्या कामकाजाबाबत आता शाशंकता निर्माण झाली .

कण्हेरखेड विकास सेवा सोसायटी ही नितिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालतं असल्याने बजरंग केंजळे सारख्या​​ भ्रष्ट सचिवावर कारवाई सोडा साधी बदली केली नाही यामुळे , बजरंग केंजळे चा गॉडफादर नितिन पाटील तर नाहीत? ना ? अशी दबक्या आवाजात संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू झाली.

हा विषय समोर येतोय न येतोच तू अंबेघर भोगवली विकास सेवा सोसायटी च्या सचिव व जिल्हा बॅंकेच्या शाखेतील अधिकार्यानी चक्क बोगस कर्ज प्रकरण करत खात्यावरील पैसे काढून वापरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . तरी देखील जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी सरकाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही , यामुळे जिल्हा बॅंकेच्या शाखेतील घोटाळा आणि केडरच्या सचिवांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: