देश-विदेश

​दिल्लीतील ​शाळकरी विद्यार्थ्यांनी बनविली कंपनी

नवी दिल्ली :

​​दिल्ली सरकारी शाळेतील विद्यार्थिनी काजलने स्वतंत्रपणे पुढाकार घेऊन, तिच्या समर्पणाने आणि मेहनतीने कंपनी स्थापन केली. अल्पावधीतच तिच्या कंपनीने देशभरात पसरलेला जबरदस्त क्लायंट बेस मिळवला.  बारावीत अकाउंट्स विषयाचा अभ्यास केल्यानंतर, काजलने तिच्या कंपनीसाठी काम करण्यासाठी २० वेगवेगळ्या प्रतिभा असलेल्या लोकांना नोकऱ्या दिल्या. सध्या ३०० पेक्षा जास्त कंपन्या तिच्या कंपनीशी संबंधित आहेत.

काजल कॉमर्सची विद्यार्थिनी होती आणि तिने शासकीय गर्ल्स उच्च माध्यमिक विद्यालय, वसुंधरा एन्क्लेव्हमधून २०१७ मध्ये १२ वी उत्तीर्ण केली. १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर काजलने पदविका कोर्स करून आपली कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.  व्यवसाय सुरू करण्यापूर्वी काजलने काही दिवस नोकरीही केली, त्यानंतर तिने यशस्वीपणे स्वतःची एक कंपनी स्थापन केली.

काजलने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० हजार रुपये गुंतवले.  सध्या, तिच्या कंपनीची वार्षिक उलाढाल अंदाजे ५० लाख रुपयांवर पोहोचली आहे.  काजलची कंपनी देशभरातील ३०० कंपन्यांना सेवा पुरवते.  तिच्या स्टार्टअप कंपनीचे काम कंपन्यांना लेखा विभागाशी संबंधित सेवा देणे आहे.

केजरीवाल सरकारने दिल्ली सरकारी शाळांमध्ये उद्योजकता मानसिकता अभ्यासक्रम (ईएमसी) सुरू केला आहे.  याद्वारे, केजरीवाल सरकारचे मुख्य ध्येय आहे की, विद्यार्थ्यांना नोकरी शोधणारे नाही, तर नोकरी देणारे बनण्यास मदत करणे आहे.  शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आता आपला व्यवसाय सुरू करू शकतात.  अशी मानसिकता निर्माण केल्याने देशात रोजगाराच्या संधी नक्कीच वाढतील आणि आपला देश चांगल्या आर्थिक विकासाच्या दिशेने पुढे जाईल.  दिल्लीच्या केजरीवाल सरकारला विश्वास आहे, की ईएमसी आपल्या देशाच्या वर्धित आर्थिक आरोग्यासाठी एक मजबूत पाया तयार करेल.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: