गोवा 

सामाजिक बांधिलकीचा ​’​गुलमोहर​’ रक्षाबंधन 

पेडणे (प्रतिनिधी)​ :​
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा सण आहे. रक्षा म्हणजे रक्षण तर बंधन म्हणजे धागा. रक्षणाचा बांधलेला पवित्र धागा म्हणजेच रक्षाबंधन होय.भाऊ या दिवशी बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो. प्रत्येक भाऊ-बहिणीच्या दृष्टीने या सणाला अमूल्य महत्व दिले जाते.या दिवशी एक बहीण तिच्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करते, तर भाऊ आपल्या बहिणीला भेट देतो आणि तिला जगातील सर्व संकटांपासून वाचवण्याचे वचन देतो.

याच रक्षाबंधनाचे औचित्य साधून गुलमोहर फाउंडेशनतर्फे कोंडलवाडा पेडणे येथील अंकिता पटेकर व शिल्पा पटेकर या दोन्ही बहिणींना आर्थिक मदत करत त्यांच्या पुढील शिक्षणाची प्रवेश फी तसेच इतर साहित्य देऊन रक्षाबंधनाचा पवित्र सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला व दुसरी बहीण जी आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्यामुळे पुढील शिक्षण घेत नव्हती त्याला याच दिवशी प्रेरित करून पुढील शिक्षण घेण्यास आर्थिक मदत करत तिचे मनोबल वाढवले व तिला धीर दिला.

अंकिता व शिल्पा पटेकर यांचे वडील नाना पटेकर हे हार्मोनियम वादक आहेत. गेली दोन वर्षे कोविड महामारीमुळे सगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, भजने,कीर्तन तसेच भजन शिकवण्याचे वर्ग बंद पडल्यामुळे त्यांचे खूप हाल झाले होते. त्यांचे वडील हे आपल्या कलेच्या माध्यमातून आपले घर चालवत होते. पण कोविडच्या काळात ती कलाच बंद होती. याची दखल घेत गुलमोहर फाउंडेशन तर्फे मदत करण्यात आली.

यावेळी गुलमोहर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश शिरोडकर, समाज कार्यकर्ते रवी हरमलकर, समाज कार्यकर्ते व नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, गुरुदास शिरोडकर, अंकिता पटेकर, शिल्पा पटेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गुलमोहर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश शिरोडकर म्हणाले की, या आधुनिक काळामध्ये सर्व ठिकाणी प्रगती होत असताना मुलं ही आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत हाच एकमेव हेतू मनात ठेवून आम्ही खास हणजुणे येथून त्यांना मदत करण्यास आलेलो आहोत.आम्हाला शक्य तेवढी मदत त्यांना केली असून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या मदतीसाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पालयेकर म्हणाले की,रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा सण आहे आणि या सणाचे औचित्य साधून गुलमोहर फाउंडेशन तर्फे या दोन्हीही बहिणींना आर्थिक मदत करून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी जी मदत केलेली आहे, त्यांचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने अडलेल्या दोन बहिणींना मदत करणे व त्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी हातभार लावणे ही खूपच मोठी गोष्ट असून माणुसकीचा लवलेश जपणारे कार्य त्यांच्या हातून होत आहे.

रवी हरमलकर म्हणाले की, आमच्या बहिणी या शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी गुलमोहर फाउंडेशनचे गणेश शिरोडकर यांनी केलेल्या मदतीसाठी त्यांनी गणेश शिरोडकर यांना धन्यवाद देत त्यांनी असेच अडलेल्यांना मदत करत आपले कार्य चालू ठेवावे असे सांगितले.

शिल्पा पाटेकर यांनी धन्यवाद देताना सांगितले की,आपल्याला केलेली ही मदत खूप मोलाची असून आमचे शिक्षण बंद राहू नये यासाठी गुलमोहर फाऊंडेशनचे गणेश शिरोडकर यांचे आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: