महाराष्ट्रसातारा 

राणेंविरोधात शिवसेनेचा ‘कोंबडी मोर्चा’

सातारा (महेश पवार) :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अपमान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात राज्यभरात वातावरण तापले आहे. ठिकठिकाणी राणेंविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर आता शिवसैनिकांनी राज्यभरात मोर्चे काढायला सुरुवात केली आहे.

साताऱ्यामध्ये राणेंचा निषेध म्हणून शिवसेनेच्यावतीने कोंबडी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते , जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे यांच्या सह अन्य शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: