गोवा 

पी. चिदंबरम गोव्यात दाखल

पणजी:
गोवा विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक तथा माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् गोव्यात दाखल झाले आहेत.
​दोन दिवसीय दौऱ्यात चिदंबरम् काँग्रेस आमदार तसंच प्रदेश समित्यांशी चर्चा करून राज्यातील स्थितीचा आढावा घेणार आहेत. चिदंबरम् यांच्या याच दौऱ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, गोवा फॉरवर्डसोबतची युती यावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, ​या दोन दिवसीय दौऱ्यात पी. चिदंबरम् काँग्रेसचे पाचही​ आमदार, ज्येष्ठ नेते, तसेच प्रदेश काँग्रेसच्या समित्यांशी बैठका घेणार आहेत. गोव्यातील सद्यस्थिती आणि काँग्रेसच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतल्यानंतर चिदंबरम् प्रदेशाध्यक्ष बदल आणि युतीसंदर्भातही ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: