क्रीडा-अर्थमत

स्लो चिता, अनिल कपूर करणार विम्याबद्दल जागरूकता

मुंबई​ : 2021: फ्युचर जेनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एफजीआयआय) च्या वतीने तरुणाईला प्रोत्साहन देण्याकरिता हेल्थ सुपर सेव्हर कॅम्पेन लॉन्च करण्यात आले. आपले आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती मानून प्रोत्साहन देण्याचे काम या कॅम्पेनद्वारे करण्यात येईल.
आरोग्य ही दीर्घकालीन गुंतवणूक असल्याची कल्पना या कॅम्पेनद्वारे घराघरात रुजवण्यात येणार आहे.

हे कॅम्पेन कंपनीच्या व्यापक वैयक्तिक आणि तरंगत्या आरोग्य पॉलिसी, हेल्थ सुपर सेव्हरभोवती फिरते. या अभिनव उत्पादनाद्वारे ग्राहकांना दावा-मुक्त वर्षाकरिता प्रीमियमवर 80%ची सवलत मिळते.

या कंपनीने सुप्रसिद्ध रॅपर स्लो चिता आणि सदाबहार अभिनेता अनिल कपूरसारख्या सेलेब्रिटीना या मोहिमेत सहभागी करून घेतले आहे. हे दोन लोकप्रिय चेहरे गुंगवून टाकणाऱ्या रॅप गीताच्या साथीने तरुणाईला पाचारण करताना दिसतील. एखादी व्यक्ती सर्वात महत्त्वाची मालमत्ता म्हणजे त्यांच्या आरोग्य गुंतवणुकीतून कसा परतावा मिळवू शकतात हे या गीतातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

फ्युचर जेनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एफजीआयआय)चे एमडी आणि सीईओ अनुप राऊ म्हणाले की, “कोविड-19 महासाथीमुळे आरोग्य विम्याची गरज आणि कल वाढीस लागला आहे. आपल्या देशातील तरुण वर्गाला आरोग्य विम्याला प्राधान्य असावे असे वाटत नाही. ते आरोग्य विम्याकडे गुंतवणूक म्हणून नव्हे, तर खर्च म्हणून पाहतात. जर “दावा” केला नाही तर “नुकसान” झाले या दृष्टीतून ते प्रीमियम भरण्याकडे पाहतात. हे कॅम्पेन आणि आमचे उत्पादन या परिघात व्यवहार करते. नवीन पिढीच्या डोक्यातील पारंपरीक विचारला छेद देण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. जेणेकरून तरुण लोकसंख्येच्या विचारधारेत बदल होण्यास हातभार लागेल.”

सर्वात मोठे एफजीआयआय हेल्थ सुपर सेव्हर कॅम्पेन प्रमुख ओटीटी मंच, म्युझिक अप आणि एफजीआयआय’च्या डिजीटल मंचांवर सुरू राहील.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: