गोवा 

स्वखर्चाने बुजवले नगरसेविकेने रस्त्यावरचे खड्डे

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :

​पेडणे पालिका क्षेत्रातील रस्त्याना पडलेल्या खड्ड्याकडे सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे स्थानिक नगरसेविकेला स्वखर्चाने खड्डे बुजवावे लागतात.

खारेबांध गांधी तीर येथील रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले होते, या विषयी स्थानिक जागृत युवक कृष्णा अरुण पालयेकर यांनी जून महिन्यात याची कल्पना सार्वजनिक बांधकाम रस्ता विभाग अभियंत्याना दिली होती. मात्र आज पर्यंत दखल घेतली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

याच खड्ड्यात पडून युवतीचा पाय ​फ्रॅक्चर
२३ रोजी याच खड्यात एक युवती पडून तिचा पाय फ्रॅक्चर होण्याची घटना घडली, तरीही सार्वजनिक रस्ता विभागाला जाग आली नाही. गेंड्याची कातडी पांघरून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी असल्याने या कडे वारंवार सांगूनही त्याना ऐकायला येत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.

धोक्याची घंटा ओळखून स्थानिक नगरसेविका आश्विनी पालयेकर व त्याचे चिरंजीव कृष्णा अरुण पालयेकर यांनी पुढाकार घेवून सामाजिक बांधिलकी ओळखून कामगार घालून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

कृष्णा पालयेकर यांनी प्रतिक्रिया देताना मागच्या दोन दिवसापूर्वी या खड्ड्यात पडून एका युवतीच्या पायाला इजा झाली, सरकारने या रस्त्यांकडे पाहण्याची गरज आहे. पडलेले खड्डे निदान चतुर्थीपूर्वी तरी बुजवावेत अशी मागणी पालयेकर यांनी केली आहे.

पेडणे सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाचे कार्यालय ५० मीटरवर असूनही पाटो रस्त्याला पडलेला भला मोठा खड्डा अधिकाऱ्याना दिसत नाही. त्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत आहे. गुरुवार हा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा दिवस त्याच दिवशी पोलीस ट्राफिक उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या जनता दरबाराची वाहतूक व्यवस्था पाहण्यासाठी मग्न होती. मात्र या​​ ठिकाणी भलामोठा पडलेला खड्डा आणि वाहतुकीची होणारी कोंडी याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. त्याबद्दल वकील जितेंद्र गावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

या पूर्वी पेडणे पालिका क्षेत्रातील पोर्तुगीज कालीन पाटोपूल व जोडरस्ता ६ जुलै ,२०१८ रोजी   कोसळून सलग पाच दिवस सर्वप्रकारची वाहतूक या रस्त्यावरून बंद  झाली होती.  त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होवून नागरिकाना विनाकारण  दूरवरच्या पर्यायी रस्त्यातून जावून आपली नियोजित कामे करावीलागत  होती, त्याची पुन्हा पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत.

पुनरावृत्ती टाळा
६  जुलै 2018 रोजी पाटो पूल रस्ता कोसळल्याने जरी दुर्घटना घडली नसली तरीही सर्वसामान्य नागरिकाना ज्या समस्यांना सामोरे जावे लागले त्याचा अंदाज नागरिकांकडे विध्यार्थ्यांकडे संपर्क साधला असता येतो .

दरम्यान आता नवीन बसस्थानक समोर असाच पोर्तुगीज काळातील पूल मुख्य रस्त्यावर उभा आहे , या पुलाचे बांधकाम दगडी फिचाणी जुन्या पद्धतीने  बांधकाम केले आहे.  आतून या पुलाला भेगा पडलेल्या आहेत, सभोवताली पूर्ण वेलींनी हा पूल लपला गेल्याने त्याचा अंदाज येत नाही, हा पूल कोसळला तर मोठी गंभीर समस्या निर्माण होवू शकत , हा पूल कोसळला तर पर्यायी रस्ते असले तरी ते रस्ते अरुंद व धोकादायक स्थितीतील असल्याने वाहतुकीची कोंडी होवून त्याचा त्रास आणि मनस्ताप स्थानिक राहिवासियाना सोसावा लागणार आहे, त्यासाठी सरकारने आणि उपमुख्यमंत्री  मंत्री बाबू आजगावकर यांनी लगेच या रस्त्यावरील  पुलाच्या बांधकामाविषयी पावले उचलायला हवीत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: