सातारा 

तालुका पोलीस स्टेशनच्या मागच्या दारच्या ‘त्या’ बाटल्या कोणाच्या?

​​सातारा ​(प्रतिनिधी) :

शहरातील राधिका रोडवरील तालुका पोलीस स्टेशनच्या मागच्या दरवाज्याजवळ दारुच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. तर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले एकीकडे जिल्ह्यातील अनेक भागात डेंग्यू ची साथ सुरू असताना पोलिस स्टेशन परिसरात मोकळे टायर पडले असून त्यात पाणी साठलेले दिसते यामुळे डेंग्यू चार फैलाव होऊ शकतो .  यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालावं अशी मागणी याठिकाणी कामानिमित्त आलेले नागरिक करत आहेत.

पण पोलिस स्टेशन च्या मागच्या दरवाज्याजवळ असलेल्या दारुच्या बाटल्या नेमक्या कुणाच्या ? नक्की पोलिस स्टेशन आहे की बिअर बार आहे असा प्रश्न उपस्थित आता नागरिक करत आहेत . आता जिल्हा पोलिस अधीक्षक काय कारवाई करणार  याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: