सातारा 

जिल्हा बॅंकेच्या घोटाळ्यावर अधिकारी- अध्यक्षांची टोलवाटोलवी…

सातारा (महेश पवार) :

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील कण्हेर खेड , आंबेघर भोगवली , निसराळे अतित शाखेतील झालेल्या घोटाळ्यावर अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले व जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सरकाळे कारवाई बाबत बोलायला तयार नाहीत , यामुळे जिल्हा बॅंकेच्या कारभारावर ​प्रश्नचिन्ह उभं राहतं.

या संदर्भात जिल्हा बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सरकाळे यांना अनेकदा ​’​राष्ट्रमत​’ ने प्रश्न उपस्थित करून खुलासा करण्याची विनंती केली मात्र त्यावर काहीच बोलायला तयार नाहीत. तुम्ही अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी संपर्क साधा सांगण्यात आले, तर कधी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी बोला आम्हाला बोलण्याची परवानगी नाही .

खरं तर बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सरकाळे यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून बॅंकेच्या झालेल्या घोटाळ्यावर खुलासा करणं गरजेचं असताना अधिकारी म्हणून पारदर्शक भूमिका न मांडल्याने आता सरकाळे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं .

मात्र अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही या सर्व घोटाळ्यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही संपर्क साधला असता, कारवाई करण्याचे अधिकार हे अधिकार्याना आहेत, असे सांगत कारवाईचा चेंडू अधिकार्याच्या कोर्टात टाकून शिवेंद्रसिंहराजे भोसले मोकळे झाले.

शुक्रवारी होणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या घोटाळ्यावर चर्चा होणार का ? जिल्हा बॅक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: