गोवा 

‘तिरंग्याचा अपमान करणाऱ्यांनी मला सल्ला देऊ नये’

पणजी :
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी मला येणारी विधानसभा निवडणूक लढविण्याचा सल्ला देऊ नये. खरंतर डिसोझा यांनी दाबोळीतून निवडणूक लढविताना आपली अनामत रक्कम जप्त होण्यापासून रोखण्याचा विचार करावा. दाबोळीत त्याचा पराभव निश्चित असून, मी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. भारत देशाच्या तिरंग्याचा अपमान करण्यानी मला सल्ला देऊ नये, असे प्रतिपादन गोवा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानावडे यांनी केले.

गोवा भाजपतर्फे सर्व मतदारसंघात गट समित्यांबरोबर शक्ती मोर्चा पदाधिकार्‍यांच्या बैठकीवेळी वरील माहिती राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानावडे यांनी दिली. राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचा मुरगाव तालुक्यातील हा दुसरा दोरा होता. यापूर्वी त्याचा दाबोळी येथील गट समिती व इतर पदाधिकाऱ्यांसोबत विविध विषयावर बैठक संपन्न झाली होती. गुरुवारी प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचा मुरगांव मतदार संघात ९ वाजता दौरा होता.

यावेळी त्यांच्यासमवेत नगरविकास मंत्री मिलिंद नाईक मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, नगरसेविका मंजुषा पिळणकर, मृणाली मांद्रेकर, नगरसेवक दयानंद नाईक, दामू नाईक, शंकर रामचंद्र कामत, मोरगाव भाजप गटाध्यक्ष संजय सातार्डेकर, महिला मोर्चा अध्यक्षा छाया होन्नावरकर, युवा मोर्चा अध्यक्ष योगेश बांदेकर, अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय अल्पसंख्यांक विभागाचे समिती माजी उपनगराध्यक्ष शशिकांत परब, माजी नगरसेवक मुरारी बांदेकर, शेखर मांद्रेकर, महादेव डिचोलकर, जयप्रकाश पेडणेकर व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष तानावडे मुरगाव सडा भागात प्रवेश करताच त्याचे मुरगांव भाजप मंडळातर्फे ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. नंतर त्यानी सडा भागातील ग्रामदेव श्री ईस्वटी ब्राह्मण लक्ष्मीनारायण देवाचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित असलेले तानावडे व मंत्री नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: