गोवा 

‘चतुर्थीपूर्वी सुटणार पाण्याची समस्या’

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
आमदार म्हणून मुलभूत गरजा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे. आता पर्यंत जसे नागरिकांनी आम्हाला सहकार्य केले तेच सहकार्य आगामी काळातही अपेक्षित आहे. असे आवाहन करून पाण्याची समस्या आगरवाडा श्री हनुमान मंदिर परिसराती पाण्याची समस्या चतुर्थीपूर्वी सोडवण्याची ग्वाही आमदार दयानंद सोपटे यांनी आगरवाडा मुख्य रस्ता ते हनुमान मंदिर पर्यंत नवीन जलवाहिनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.

आगरवाडा येथे २७ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आगरवाडा सरपंच प्रमोदिनी आगरवाडेकर, माजी सरपंच संगीता नाईक, माजी उपसरपंच भगीरथ गावकर, माजी उपसरपंच नितीन चोपडेकर, मोरजी माजी सरपंच मंदार पोके, महिला अध्यक्षा नयनी शेटगावकर, माजी सरपंच एकता चोडणकर, गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत, आदी उपस्थित होते.

हनुमान मंदिर परिसरातील काही घराना आज पर्यंत नळाच्या पाण्याची सोय नव्हती , त्यासाठी आमदार दयानंद सोपटे व स्थानिक पंच मंडळीनी प्रयत्न करून नवीन जलवाहिनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जी जी सुचना आपण केली त्याचे काटेकोरपणे पालन केल्याने त्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

या परिसरात चतुर्थी पूर्वी पाणी घरात पोचणार असे सांगितले.

माजी सरपंच संगीता नाईक यांनी बोलताना आमदार सोपटे यांच्या सहकार्यातून या परिसराला नळातून पाणी उपलब्ध होणार आहे. त्याबद्दल तिने समाधान व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: