गोवा 

काँग्रेसच्या जिल्हा आणि विभाग समित्या बरखास्त

पणजी :
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष नव्याने संघटना बांधणी करत आहेत. गेल्या काही दिवसांत भाजपने राज्यातील विविध समित्यांची पुनर्रचना केल्यानंतर आता राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसनेदेखील या दिशेने पाऊल टाकले आहे. आणि त्यानुसार आज राज्यातील दोन्ही जिल्हा काँग्रेस समित्या आणि त्याचसोबत विभाग समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत.

पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर याना पाठवलेल्या पत्रानुसार राज्यातील विभाग आणि जिल्हा काँग्रेस समित्या या त्वरित बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे या सर्व समित्यांची पुनर्र्चना येत्या महिनाभरात करण्याचीही सूचना या पत्रामध्ये दिलेली आहे. विभाग समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य त्याचप्रमाणे जिल्हा समित्यांचे सदस्य यांची बरखास्ती यामध्ये झाली असून, जिल्हा अध्यक्ष मात्र आपला  कार्यभार कायम ठेवतील असेही नमूद करण्यात आले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: