गोवा 

‘पारंपारिक ओहळाचे रक्षण करा’

पेडणे (प्रतिनिधी) :
रस्त्याच्या बाजूला किंवा आपल्या परिसरात पावसातील पाणी जाण्यासाठी असलेल्या ओहाळची प्रत्येकाने निगा राखायला हवी, नाही तर पावसाळ्यात सर्व पाणी रस्त्यावर शेतात घरात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसानी होत असते. ती नुकसानी टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करत असताना आपल्या परिसरात जे पारंपारिक ओहळ आहे, त्याची निगा राखण्याचे आवाहन आमदार दयानंद सोपटे यांनी चोपडे येथे नाला कम कलवट कामाचा शुभारंभ केल्यानंतर बोलत होते.

चोपडे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आगरवाडा सरपंच प्रमोदिनी आगरवाडेकर, माजी सरपंच एकता चोडणकर, माजी सरपंच बाबली उर्फ बाबा राऊत, माजी सरपंच संगीता नाईक, माजी पंच एकनाथ चोडणकर, गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत, माजी उपसरपंच तथा पंच नितीन चोपडेकर, एकनाथ चोडणकर पंच भगीरथ गावकर, मोरजी पंच मुकेश गडेकर, आदी उपस्थित होते.

आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना काही प्रमाणात जे पारंपारिक ओहाळ होते ते ओहाळ बुजलेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येवून तळ्याचे स्वरूप येते. त्यामुळे रस्त्यावर जी वाहने धावतात किंवा पादचारी चालताना त्याना बराच त्रास होत होता. याची दखल घेवून हे काम हाती घेण्यात आले आहे. पारंपारिक नाला त्यांची दुरुस्ती करण्यात येत असल्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी सांगितले.

यावेळी पंच नितीन चोपडेकर यांनी आमदार दयानंद सोपटे याना या नाल्याबरोबर दुसऱ्याही नाल्याची दुरुस्ती करावी अशी सुचना केली असता लगेच आमदार दयानंद सोपटे यांनी दोन्ही नाल्यांची दुरुस्ती केली जाईल असे सांगितले.

यावेळी माजी सरपंच एकता चोडणकर यांनी बोलताना आमचे आमदार दयानंद सोपटे हे तळागाळात जावून विकासाचे प्रकल्प राबवत असतात. त्यामुळे २०२२ च्या निवडणुकीतही आमदार दयानंद सोपटेच असणार असा विश्वास व्यक्त केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: