क्रीडा-अर्थमत

‘वी’ने वाढवली गिगानेट ४जी नेटवर्कची क्षमता

पणजी :
आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी वी​​ ने आपल्या ३जी स्पेक्ट्रमची ४जी मध्ये श्रेणीसुधारणा करण्याची प्रक्रिया पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, गोवा, जळ​​गाव, नांदेड, सांगलीमिरजकुपवाड, अमरावती, अहमदनगर, अकोला, भिवंडी, उल्हासनगर, वसईमध्ये आपल्या बहुतांश साईट्सवर पूर्ण केली आहेयामुळे या शहरांमधील गिगानेट ४जी क्षमता लक्षणीय प्रमाणात सुधारेलमहाराष्ट्र आणि गोवा टेलिकॉम सर्कलमध्ये ३जी स्पेक्ट्रमला ४जीमध्ये श्रेणीसुधारण करण्यासाठी कंपनीने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा हा एक भाग आहे. ९०० मेगाहर्ट्झ आणि २१०० मेगाहर्ट्झ बँड स्पेक्ट्रम्सवर ५ मेगाहर्ट्झ तैनात करून सध्याच्या ४जी पायाभूत सोयीसुविधांना मजबूत करण्याचा अर्थ असा की, पुणे नाशिक, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, गोवा, जळगाव, नांदेड, सांगलीमिरजकुपवाड, अमरावती, अहमदनगर, अकोला, भिवंडी, उल्हासनगर, वसई याठिकाणच्या वी ग्राहकांना घरे, कार्यालये इत्यादींच्या आत अधिक चांगल्या नेटवर्क कव्हरेजचे तसेच डाउनलोड व अपलोडच्या अधिक जास्त वेगाचे देखील लाभ मिळतील.

 

३जी स्पेक्ट्रमला ४जी मध्ये श्रेणीसुधारित करून सध्याच्या ४जी पायाभूत सोयीसुविधांमध्ये वृद्धी करण्यात आल्यामुळे वी गिगानेट ४जी चे अधिक व्यापक कव्हरेज, नेटवर्क गुणवत्ता आणि ट्रॅफिक कॅरेजची अधिक मजबूत क्षमता असे तिहेरी लाभ पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, गोवा, जळगाव, नांदेड, सांगलीमिरजकुपवाड, अमरावती, अहमदनगर, अकोला, भिवंडी, उल्हासनगर वसई येथील ग्राहकांना मिळतीलसर्वात जास्त कार्यक्षम ९०० मेगाहर्ट्झ बँड स्पेक्ट्रम राज्यात सर्वाधिक तैनात करण्यात आल्यामुळे ग्राहकांना अधिक जास्त सुस्पष्ट आवाज आणि घर, कार्यालये इत्यादींच्या आत देखील मोबाईलचा अधिक चांगला अनुभव घेता येईल९००, १८००, २१००, २३०० आणि २५०० बँड्समध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त स्पेक्ट्रम क्वांटम देखील वी कडे आहे.

आपल्या ४जी हॅन्डसेटमध्ये ४जी सिम वापरून वी ग्राहक ४जीचा अधिक चांगला अनुभव घेऊ शकतात.    वी ग्राहक आपल्या ३जी सिमला ४जीमध्ये निःशुल्क बदलून वी गिगानेटचे जास्तीत जास्त लाभ मिळवू शकतात.

वोडाफोन आयडिया लिमिटेडचे महाराष्ट्र व गोव्याचे क्लस्टर बिझनेस हेड पुनीत कृष्नन यांनी सांगितले, “नेटवर्क वृद्धीचा हा उपक्रम म्हणजे डेटाची वाढती मागणी पूर्ण करण्याकरिता आमच्या ग्राहकांना अधिक सुधारित ४जी अनुभव मिळवून देण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे९०० तसेच २१०० मेगाहर्ट्झ लेयर्समध्ये विस्तार करून सध्याच्या ४जी पायाभूत सोयीसुविधांना बळकटी देऊन आणि महाराष्ट्र व गोव्यामध्ये सर्वात कार्यक्षम ९०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम सर्वाधिक तैनात करून या राज्यांमधील काही महत्त्वाच्या शहरांमधील वी ग्राहकांना आम्ही अधिक डेटा वेग व घरे, इमारतींच्या आत देखील अधिक चांगला नेटवर्क अनुभव मिळवून देत आहोत३जी ते ४जी श्रेणीसुधारण पूर्ण झाल्यानंतर या शहरांमधील डेटा ट्रॅफिकमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे आमच्या निदर्शनास आले होतेमहाराष्ट्रातील इतर भागांमध्ये देखील हा उपक्रम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

 

गेल्या वर्षभरात ग्राहकांच्या सवयी आणि वर्तणुकींमध्ये अनेक मोठे बदल घडून आलेडेटाची मागणी अनेक पटींनी वाढली आणि डिजिटल समाजामध्ये टेलिकॉम नेटवर्क्स हा एक अनिवार्य स्तर बनलात्यामुळे व्यावसायिक तसेच निवासी भागांमध्ये देखील २४X७ उच्च वेगवान मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी असणे महत्त्वाचे असल्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहेसध्याच्या ३जी ते ४जी स्पेक्ट्रम श्रेणीसुधारणामुळे वी ला महाराष्ट्र व गोव्यातील व्यक्तिगत तसेच व्यावसायिक ग्राहकांच्या गरजा व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी स्पेक्ट्रमच्या जास्तीत जास्त उपलब्धतेमध्ये आणि वापरामध्ये आघाडी मिळाली आहे.

Share

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: