नाशिक

जयंत पाटील मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या भेटीला

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करत नुकसानग्रस्त मराठवाड्याकडे धाव घेतली असून उद्या चाळीसगाव, औरंगाबाद भागातील पूरपरिस्थितीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा देणार आहेत.

मागील दोन दिवसापूर्वी मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी दरड कोसळली होती तर बर्‍याच गावांमध्ये पूराचे पाणी घुसुन घरांचे नुकसान झाले होते. तर दुसरीकडे या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मराठवाड्यातील या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी उद्या (शनिवारी) मंत्री जयंतराव पाटील यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.

आपल्या दौऱ्यादरम्यान मंत्री जयंतराव पाटील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत तर झालेल्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन लवकरात लवकर नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यानंतर मंत्री जयंतराव पाटील औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
%d bloggers like this: