मुंबई 

कुंपणानेच शेत खाल्ले; किरीट सोमय्या यांना कोर्टाचा दणका

​मुंबई (अभयकुमार देशमुख) :

विविध नेत्यांवर आरोप करणे. त्यांच्या विरोधात तक्रारी करणे, या गोष्टीमुळे सध्या चर्चेत आसलेल्या माजी खासदार किरीट सोमय्या यांना २५ ने न्यायालय महानगर दंडाधिकारी शिवडी न्यायालयाने दणका दिला आहे. प्रविण कलमे हा गृहनिर्माण विभागातील सचिन वाझे असा उल्लेख अर्थ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण कलमे यांच्यावरही सोमय्या यांनी ०१/०४/२०२१ रोजी केले होते. त्यामुळे त्याला आव्हान देत कलमे यांनी न्यायालयात धाव  घेवून किरीट  अब्रूनुकसानीचा जावा घेतली होती. कलमे यांची याचिका दाखल करून घेऊन न्यायालयाने सुनावणी सुरू केली आहे. त्यामुळे आता सोमय्या यांनाही न्यायालयाच्या माराव्या लागणार आहे.

गृहनिर्माण विभाग, एस आर ए, म्हाडा या संस्थांमध्ये काम करणाऱ्या बिल्डरांकडून 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश सध्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रवीण कलमे यांना दिले आहेत.  आणि प्रवीण कलमे हे या सरकारी संस्थांमधील सचिन वाझे आहेत. असे आरोप किरीट सोमय्या यांनी एप्रिल महिन्यात केले होते. त्या आरोपांना आव्हान देत प्रवीण कलमे आणि अर्थ या स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ही याचिका दाखल करून घेत सोमय्या यांचे आरोप खोटे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. तसेच सदरच्या प्रकरणाची सुनावणी ही सुरू झाली आहे. त्यामुळे सोमय्या यांना येणाऱ्या 22 सप्टेंबर आणि 5 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे. एवढेच नाही तर  केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी सोमय्या यांना आता आटापिटा करावा लागणार असल्याचे अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण कलमे यांनी सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन कलमे यांनी ही माहिती दिली आहे.

विशेष म्हणजे लोकांवर आरोप करणारे सोमय्या आपल्या जवळच्या विकासक मित्रांचे बेकायदेशीर बांधकाम  वाचवण्यासाठी बेछूट आरोप करत आहेत. मुंबईतील शेकडो इमारती नियमबाह्य पद्धतीने  उभारलेल्या आहेत. त्याविरोधात आम्ही 68 माहितीचा अधिकार टाकून माहिती मिळवली आहे. एवढेच नाही तर यावर कारवाई करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहारही केला असल्याचे कलमे यांनी यावेळी बोलताना सांगितले. पण मुकेश दोषी यांची क्रिस्टल प्राईड  आणि आनंद पंडित यांची लोटस डेव्हलपर्स या दोन बिल्डरसाठी सोमय्या जिवाच रान करत असल्याचाही आरोप यांनी केलाय. तसेच आनंद पंडित हे किरीट सोमय्या यांच्या संस्थेत पदाधिकारी सुद्धा असून  आनंद पंडित यांच्याकडून सोमय्या यांच्या संस्थेला आर्थिक मदत येत असल्याचेही कलमे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी काळात न्यायालयीन लढा असाच सुरू राहणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.​​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: