गोवा देश-विदेशसिनेनामा

प्रसून जोशी, मनोज वाजपेई, रसूल पकुट्टी निवडणार ‘क्रिएटिव्ह माईंड’

यावर्षीच्या इफ्फीमध्ये 75 उदयोन्मुख कलाकारांची विशेष निवड

पणजी :
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या इफ्फीतील विविध विभागांची घोषणा सध्या दररोज सुरु आहे. दरेकवर्षी केंद्राच्यावतीने इफ्फीमध्ये काही ना काही नाविण्य साधण्याचा प्रयत्न सुरु असतो. या पार्श्वभूमीवर देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत इफ्फी देशभरातील 75 उदयोन्मुख कलाकारांना विशेष निवड करणार आहे. देशातील मान्यवर सिनेकर्मींनी निवड समिती या 75 कलाकारांची घोषणा उद्या करणार आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत तसेच देशातील युवा सर्जनशक्तीला आणि उदयोन्मुख प्रतिभेला शोधून, त्यांना प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फीमध्ये देशातील युवा सिनेकर्मीकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत, ज्यांच्यापैकी 75 सर्जनशील सर्वोत्तम सिनेकर्मींची निवड केली जाणार असून, त्यांना 52 व्या इफ्फीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या ‘75 क्रिएटिव्ह माईन्ड्स ऑफ टूमारो (उद्याची 75 सर्जनशील व्यक्तिमत्वांना) गोव्यात होणार्‍या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याचे विशेष आमंत्रण असेल. या महोत्सवात ते चित्रपट सृष्टीतील नामवंतांशी चर्चा करु शकतील. महोत्सवादरम्यान होणारे मास्तर क्लासेस/ इन-कन्व्हरसेशन अशी चर्चासत्रे, परिसंवाद यातही ते सहभागी होऊ शकतील. यात निवड झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा प्रवासाचा आणि निवासाचा खर्च इफ्फीच करणार आहे.

या 75 सिनेकर्मींची निवड करण्यासाठी दोन निवड समित्यांचे गठन करण्यात आले आले. यातील ‘ग्रँड ज्युरी’ समितीमध्ये नामांकित गीतकार आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन (सेन्सॉर बोर्ड) मंडळचे अध्यक्ष प्रसून जोशी, नामांकित दिग्दर्शक केतन मेहता, प्रसिध्द संगीतकार/गायक शंकर महादेवन, राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता मनोज वाजपेई, ऑस्कर विजेता ध्वनिमुद्रक रसुल पुकुट्टी, निर्माता/दिग्दर्शक विपुल शहा यांचा समावेश आहे.

iffi logo
हे आहेत ‘सिलेक्शन ज्युरी’
वाणी त्रिपाठी टिक्कू – निर्माती/अभिनेत्री, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ सदस्य.
अनंत विजय – लेखक आणि चित्रपट समीक्षेसाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते
यतींद्र मिश्रा – प्रसिद्ध लेखक, चित्रपट समीक्षेसाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते
संजय पुरन सिंग – चित्रपट निर्माते, सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते.
सचिन खेडेकर – अभिनेते, दिग्दर्शक

‘यांचा’ असणार समावेश
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषणा केल्याप्रमाणे इफ्फीच्यावतीने निवडण्यात येणार्‍या या देशातील 75 युवा सिनेकर्मींमध्ये निर्माते, अभिनेते, गायक, पटकथा लेखक, कला दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर यांचा समावेश आहे. देशभरातून मागवलेल्या अर्जांमधून सुरुवातील 150 आणि त्यातून अंतिम 75 सिनेकर्मी इफ्फीमध्ये सहभागी होणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: