गोवा 

कुंकळ्ळी नगरपरिषद अस्थिर करण्यामागे एल्विस गोम्स?

कुंकळ्ळी : 
गोवा विधानसभेची निवडणूक अवघी काही महिन्यावर आलेली असताना आता नव्याने काँग्रेसचा हात धरलेले काही नेते आता संघटनेत आपले उपद्रव्यमूल्य वाढवण्यावर भर देताना दिसत आहेत. कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघात नुकतेच आमी आदमी पक्षातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले एल्विस गोम्स हे देखील कुंकळ्ळी विधानसभा क्षेत्रात आपले स्थान बळकट करण्याच्या नादात स्थानिक नगरपालिकाच अस्थिर करत असल्याचे म्हटले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर संध्या देसाई यांनी दाखल केलेल्या याचिका क्रमांक १००३/२०२१ नुसार कुंकळ्ळी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीला दिलेल्या आव्हानामुळे या नगरपालिकेतील काँग्रेसप्रणित सत्ताधारी पॅनललाच अस्थीरतेच्या दरीत लोटले जात आहे. आणि या सगळ्यामागे एल्विस गोम्स यांचाच हात असल्याचे म्हटले जात आहे.

या नगरपालीकेत १४ पैकी ९ जागा जिंकून काँग्रेसने पूर्ण बहुमताने सत्ता मिळवली आहे.अशावेळी अवघ्या महिनाभरापूर्वीच काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एल्विस गोम्स यांच्या पाठींब्यामुळे दाखल करण्यात आलेल्या या याचिकेमुळे कुंकळळीतील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

एल्विस गोम्स यांनी नगर विकास संचालक आणि राज्य निवडणूक आयुक्त यांना पाठवलेले एक पत्र (ईमेल) या याचिकेमध्ये पान क्रं. २५ वरील ‘एक्झिबिट एफ’मध्ये जोडले आहे. यानुसार ४ फेब्रुवारी २०२१ रोजी ११ नगरपालिकेतील महिलांच्या आरक्षणाबद्दलच्या निर्णयाबद्दलच्या ८५/२०२१ क्रमांकाच्या  याचिकेवर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

एल्विस गोम्स हे ८ ऑगस्ट २०२१ रोजी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर २२ दिवसांनी म्हणजे,  ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सदर याचिका गोवा खंडपीठासमोर सादर झाली आहे, आणि ९ सप्टेंबर २०२१ रोजी देण्यात आलेल्या सूचनेनुसार  यासंदर्भातील नगरसेवक आणि सर्व संबंधितांना १४ सप्टेंबर २०२१ रोजी सुचनापत्र मिळाले  व २७ सप्टेंबर पर्यंत आपले म्हणणे मांडण्याची सुचना देण्यात आली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्ष नेमकी काय भूमिका घेणार कि आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सगळ्या प्रकाराकडे कानाडोळा करणार याकडे गोमंतकियांचे लक्ष लागले आहे.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: