कला-साहित्यगोवा 

कोंकणी भाषा मंडळाचे पुरस्कार जाहीर

फातोर्डा:
कोकणी भाषा मंडळाने आज 2021 वर्षाचे विविध पुरस्कार जाहीर केले आहेत. हे पुरस्कार 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता मंडळाच्या 59व्या वर्धापनदिनी ऑनलाईन पद्धतीने आयोजित कार्यक्रमात हे प्रदान केले जातील.

1) सेवा पुरस्कार – सुरेश पै  2) सॅराफीन कोता पुरस्कृत फेलिसियु कार्दोज स्मरणार्थ शिक्षक पुरस्कार अनंत अग्नी 3)  जुजे पियेदाद क्वाद्रुस स्मरणार्थ कार्यकर्ता पुरस्कार – शिरीष पै 4) लिगारियो फुर्ताद ट्रस्ट पुरस्कारीता पुरस्कार – फा. किरीयल डिसौझा 5) दिनेश मणेरकर पुरस्कृत चंद्रकांत केणी स्मरणार्थ स्तंभलेखन पुरस्कार – महेश दिवेकर  6) दिनेश मणेरकर पुरस्कृत रामनाथ मणेरकर भाषांतर पुरस्कार – पांडुरंग नाडकर्णी (पुस्तक) पाखांट्याबगर भुर्रर्र), 7) स्व. नरसिंह दामोदर नायक स्मरणार्थ साहित्य पुरस्कार – फा. मायरन जेसन बार्रेटो (पुस्तक – आपारीन्तल्यान संदेश – निबंध),  8) स्व. रॉक बार्रेटो स्मरणार्थ साहित्य पुरस्कार – स्व. श्रीधर कामत (पुस्तक – बेसूर – नाटक), 9) रमेश वेळुस्कर स्मरणार्थ साहित्य पुरस्कार – वामन टाकेकर (दया धन – कादंबरी).

 

पुरस्कारांची निवड करण्यासाठी परिक्षक मंडळाची नियुक्ती मंडळाने केली होती. यामध्ये साहित्य पुरस्कार – प्रो. डॉ. प्रकाश वजरीकर, वसंत भगवंत सावंत, मार्कूस गोन्साल्विस तर यंदा मनोहर राय सरदेसाई  स्मरणार्थ बाल साहित्य पुरस्कार देण्यात आला नाही असे मंडळाच्या अध्यक्षा अन्वेषा सिंगबाळ यांनी सांगितले. वरील सर्व पुरस्कार आज त्यांनी जाहीर केले. या प्रसंगी उपाध्यक्ष पॉब्र फर्नांडिस व सचिव उल्हास गावकर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: