गोवा 

‘पेडणे सोसायटी राज्याची आदर्श सोसायटी’

पेडणे (प्रतिनिधी) :
पेडणे तालुका शेतकरी सेवा सोसायटी हि संस्था पेडणे तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील आदर्श संस्था आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने कोरोना काळातही भरीव कामगिरी केली आहे. संस्थेचे जाणकार चेरमेन मिलिंद केरकर हे निवृत्त झाले तरीही त्यांनी आपला अनुभव संस्थेला कायमस्वरूपी द्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पेडणे येथील पेडणे तालुका शेतकरी सेवा सोसायटीच्या ४६ व्या वर्धापनदिनानिमित्ताने प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर सहकार निबंधक अरविंद खुटकर कृषी अधिकारी प्रसाद परब, संस्थेचे चेरमेन संतोष मळीक, उपाध्यक्ष विठोबा बगळी, संचालक रामदास परब, शाम्बा सावंत, राजाराम गवस, गजानन शेट कोरगावकर, ज्ञानेश्वर परब, सुहास नाईक, उमेश गाड, गोपाळ परब, श्रीपाद परब, रामा परब, उमेश शिरोडकर कार्यकारी संचालक संदेश कदम आदी उपस्थित होते.

स्वागत प्रस्थाविक चेअरमन संतोष मलिक यांनी तर सूत्रसंचालन प्रा. विठोबा बगळी यांनी केले.

यशवंत विध्यार्थ्यांचा गौरव

पेडणे तालुक्यातील जिग्नेश शिरोडकर, अंशीका बर्डे, धनश्री नाईक, साईश हरमलकर, महादेव गणपुले, याचा शिष्यवृत्ती देवून गौरव करण्यात आला.

प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार

केशव नाईक, नकुल नारूलकर, आपा परब, दिलीप नाईक, एकनाथ तुळसकर, प्रभाकर परब, संतोष नाईक, राजेंद्र सावळ, पांडुरंग पेडणेकर, श्रीपाद नाईक, सुर्यकांत पोलजी, भगवान परब, सखाराम सावंत, रघुवीर सावंत, ब्र्हमानंद परब, लाड्जी नाईक, दिलीप गाड, विलास शिरोडकर, नंदकुमार परब, दीपक मांद्रेकर, बाबी साळगावकर, दिनेश कांबळी, दशरथ गावकर या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सेवा निवृत्त कर्मचारी नामदेव गडेकर, नामदेव कांबळी, संतोष नाईक, शोभा मिशाळ, यांचा गौरव करण्यात आला.

शेवटी गजानन शेट कोरगावकर यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
%d bloggers like this: