सातारा 

​शिवेंद्रसिंहराजेंच्या बालेकिल्ल्यात कृषी मंत्री दादाजींची पक्षपेरणी…

सातारा  (महेश पवार) :
महाराष्ट्राचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे  यांचा सातारा तालुक्यातील परळी येथे होणाऱ्या पक्ष प्रवेश व शेतकरी मेळाव्याकडे संपूर्ण तालुक्यांचे लक्ष लागून राहिले. गेली कित्येक वर्षे परळीने आमदारकी असो व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यात परळीने नेहमी एकहाती सत्ता दिली. पण तरीही परळी भागात उरमोडी धरणाशिवाय दुसरं काही विकासात्मक काम झालेलं नसल्याने भागातील शेतकऱ्यांना शेतीशिवाय आजही दुसरा रोजगार उपलब्ध नसल्यामुळे रोजंदारीसाठी मुंबई पुणे गाठावं लागते.

आजही अनेक गावं मागास आहेत. यामुळे गेली अनेक वर्षे आमदार असलेल्या आणि ज्या परळी भागाच्या जिवावर बिनधास्त निवडून येणार्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बालेकिल्ल्याला फोडण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली. यासाठी शिवसेनेच्या वतीने परळी भागात शिवसेना पक्ष प्रवेश व शेतकरी मेळाव्याचे नियोजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी केले आहे. या मेळाव्याला कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई, शिवसेना नेते नितीन बानगुडे पाटील, आमदार महेश शिंदे यांच्या सह अनेक शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामुळे परळी भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
%d bloggers like this: