पुणे 

भाजप आमदाराची मनपा महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ

​​पुणे​ (अभयकुमार देशमुख) :

​​पुण्यातील भाजप आमदाराने महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भाजपचे पुणे केन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेच्या एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अर्वाेच्च भाषेत केलेली शिवीगाळ आता समोर आली आहे.

भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मनपाची ही संबंधित महिला अधिकारी ह्या महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडील एका कामासंदर्भात आमदार कांबळे यांनी एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधला. यावेळी संबंधित महिला अधिकाऱ्याने काही वरीष्ठ अधिकाऱ्यांची  परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. त्यावर चिडलेल्या कांबळे यांनी या महिला अधिकाऱ्याला  घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली.

त्यानंतर महिला अधिकाऱ्याने फोन कार्यकर्त्यांच्या हातात दिला. त्यावर कांबळे यांनी कार्यकर्त्याला फोन स्पिकरवर ठेवायला सांगुन पुन्हा शिवागीळ केली. तसेच काही पुरुष अधिकाऱ्यांचे नाव घेत त्यांच्याही नावे शिवीगाळ करीत त्यांना धमकावले. या मोबाईल रेकॉर्डिंगचे संभाषण व्हायरल झाले असून ते काही महिन्यांपूर्वीचे असल्याची माहिती समोर येत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: