मुंबई 

‘आदिवासी कार्यालयासाठी द्यावी शासनाने जागा’

मुंबई :
ठाणे, नवी मुंबई, मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मोठया प्रमाणात राहत असून, या आदिवासी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनातर्फे मुंबईत एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात आले आहे. परंतु मागील कित्येक वर्षांपासून हे कार्यालय बोरीवली पूर्व येथील महानगरपालिकेच्या शाळेत भाडेतत्त्वावर सुरू आहे. या कार्यालयासाठी आता शासनाने कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुंबईतील आदिवासी समाजातर्फे जोर धरू लागली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मुंबई विभागीय अदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील कुमरे म्हणाले, शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या एकात्मिक आदिवासी कार्यालयामार्फत आदिवासी जनतेकरिता अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. म्हणूनच मुंबईत राहणाऱ्या आदिवासी जनतेला हे कार्यालय अत्यंत उपयोगी ठरत आहे. परंतु गेली कित्येक वर्षे हे कार्यालय बोरिवली येथील महापालिका शाळेत भाडेतत्वावर सुरू आहे. म्हणूनच मुंबई विभागीय आदिवासी काँग्रेसने, मुंबईतील सर्व आदिवासी जनतेच्या वतीने पर्यावरणमंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याजवळ विनंती केली आहे की, मुंबईतील आदिवासी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयासाठी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या अधिपत्याखाली कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी. या मागणीचे पत्र मुंबई विभागीय आदिवासी काँग्रेस तर्फे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना पाठविण्यात आलेले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: