सातारा 

‘बजरंग केंजळे प्रकरण’ जिल्हा केडर सचिवांचा पर्दाफाश करणार? 

​सातारा (महेश पवार) :
जरंडेश्वर कारखाना प्रकरणात, ईडी प्रश्नांचा खुलासा करणारे राजेंद्र सरकाळे डिस्ट्रिक्ट सुपरव्हिजनच्या कामकाज, याबद्दल त्यांना दिलेले प्रश्न स्वीकारालया नाकारणारे, आम्हाला न काळत त्यांची सुपर पॉवर वजा बँकेची त्यांच्यावरील अवलंबून असलेली परिस्थितीचा अंदाज देऊन गेली.

पत्रकार वर्गाची बँकेतील मोठमोठ्या नामांकित सज्जन लोकांच्या नावाचा वापर करत, माहिती नाकारणे उडवाउडवी करणे, बँकेच्या विषय सोडुन ​अवांतर विषय काढणारे सरकाळे CEO पदी विराजमान आहेत कि कोणत्या वेगळ्या रोलमध्ये?

गेल्या 2 महिन्यात त्यांनी त्यांच्यावरील अदृश्य दबाव  यानावाखाली पत्रकारांना तर सोडा, कोरेगाव तालुका कार्यालयाचे वर्ग श्रेणी 1 च्या अधिकारी वर्गाने दिलेल्या लेखी घोटाळा अहवाल, व त्यावरील कार्यवाहीचा खुलासा केलेला नाही. सहकार आयुक्त, कोल्हापूर विभागीय सहनिबंधक आणी सहकारमंत्री यांच्या सुद्धा निर्देशना न जुमानणारे हे राजेंद्र सरकाळे नक्की काय प्रकार आहे समजणे अवघड झालंय.

प्रत्येक वेळी कोठेही तक्रार झाली कि सर्व यंत्रणांचा व्यवस्थित वापर करत, अभ्यासपूर्वक अडचणी शोधत, गावपातळीवरील संचालक मंडळाच्या विचारांचे कार्यकर्ते बोलावत व्यवस्थित कार्यक्रम लावणं ही त्यांची मोठी जमेची बाजू.

मागील DDR अष्टेकर यांनी तसेच नवीन DDR माळी साहेब यांनी केडरच्या बाबतीतील सर्व प्रश्नांची उत्तरे द्या असे लेखी निर्देश देऊनसुद्धा, त्यांना सुद्धा केराची टोपली दाखवली आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या अडचणी सांगून, वेळ मारून नेणे, बँकेच्या इतर विषयांची चर्चा करत मूळ विषयावरून विषयांतर करणे हे एखाद्या मुसद्दी राजकारण्याला पण भुरळ घालेल असा मवाळ अभिनय तर विशेष खुबी.

आता स्वतः नाबार्डचे पुरस्कार घेणारे, नाबार्डला त्यांनी सचिव घोटाळ्याबाबत काय उत्तरे दिलीत ते सांगू शकले नाहीत.

थोडक्यात दमदार संचालक मंडळ व महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्वाच्या नावांचा वापर करत, प्रश्न विचारणा करणार्यांना त्यांच्यातील उणीवा सांगत स्वतःचाच अजेन्डा रेटणे व वाटतील त्या गोष्टी बोलत प्रश्न विचारणाऱ्यांची थट्टा  करत मोडून काढणे हे प्रकार अवलंबणे योग्य नाही.

बजरंग केंजळे स्वतः कबूल असताना, कण्हेरखेडचे पदावर असलेल्या लोकांनी त्यांच्यासमोर आम्हाला दुबारपीककर्ज केल्याचं कबूल केलेलं असताना, त्या सचिव v झालेल्या गैरप्रकाराबद्दल न बोलता ही कोणती सहकारी माफियागिरी चालवतात हे न समजण्यासारखं आहे.

सर्व केडरच्या सचिवांचे नेतृत्व जर असं असेल तर, बजरंग केंजळेचे हेड मास्तर, राजेंद्र सरकाळे नसतील कशावरून???

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
%d bloggers like this: