सातारा लेख

जिल्हा बँक शेतकऱ्यांची, ही अंधश्रद्धा!

महेश पवार :

​दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असलेली जिल्हा बँक,तिची कार्यकारिणी ही शेतकऱ्यांना न्याय देणारी असावी अशी विचारसरणी ठेवून उभ्या केलेल्या जिल्हा बँका ह्या गेल्या अनेक दशकात, संस्थानिक, आमदार, खासदार, साखर उद्योजक यांच्या जिल्ह्यातील सर्व आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांची उकल करणारी “मास्टर की” बनली आहे.

राज्याच्या राजकारणात असलेल्या मंत्र्यांना,राज्याचे सभागृह यांचं नेतृत्व करणार्यांना पण जिल्हा बँकेची भुरळ लागलीय. त्याचं सर्वात मोठं कारण, तिथे एकदा संचालक झालो की सर्व सहकारी संस्था, त्यांचे संचालक, कर्मचारी हे आपोआप आपल्या राजकीय किंवा तत्सम मतदार संघात आपली पाळेमुळे घट्ट करण्याची एक नामी संधी मिळते . यामुळे त्या त्या संस्था आणी कर्मचारी हे आपल्या विचारांचे आहेत असं सांगत, गावागावात आपल्या अस्तित्वाची व पक्षाची जाणीव करून देताना दिसतात मात्र शेतकऱ्यांना कर्जसाहाय्य करताना, डावं उजवा, आपला, परका  असा भेदाभेद करत ” घालीन लोटांगण  वंदीन चरण “‘ह्या अवस्थेत आणल्याखेरीज सोडायचा ही रननिती वापरून सगळं नियोजन केले जाते .

शेतकरी ह्या” गोंडस नावाखाली संघटित राजकीय विचारांच्या टोळ्या बनवत, जिल्ह्यातील राजकीय पुढारी, साखर उद्योजक ( म्हणजेच आमदार, खासदारकीच्या ) एजनस्या. निर्माण करणारी प्रक्रिया म्हणजेच  जिल्हा बँक निवडणूकां , यात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारी ही पुढारी मंडळी, ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषद मध्ये सत्तेत असताना कधी एकत्र नांदली नाहीत, पण जिल्हा बँकेतील त्यांच्या विचारांची एकवाक्यता कमालाच म्हणावी लागेल.

सर्व सहकारी व्यवस्थेचा मालक म्हणजेच त्यांच्या भागभांडवलात स्वतःच्या कष्टाच्या कमायीच्या पैशातून गुंतवणूक करणारा शेतकरी हा त्या त्या संस्थाचा मालक आहे ही सर्वात मोठी अंधश्रद्धा ठरली . यामुळे भविष्यात जिल्हा बॅक शेतकर्यांची नव्हे तर राजकारण्यांचा सहकार अड्डा म्हणायला हरकत नाही…..​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: