मुंबई 

लोढा पलावातील कचरा समस्येकडे बी. शामराव यांनी वेधले लक्ष 

कल्याण :

कल्याण डोंबिवली मनपा हद्दीतील विभाग क्र. 122 मधील लोढा पलावा हेवन भागामध्ये गेल्या काही महिन्यांपासून कचर्‍याची समस्या तीव्र झाली आहे. येथील कचरा अव्यवस्थापनामुळे स्थानिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत होते. स्थानिक समाजसेवक आणि काँग्रेसचे कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याचे सरचिटणीस बी. शामराव यांनी जनतेच्या या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून, याबद्दलची पत्रे त्यांनी विभागीय आयुक्त तथा आरोग्य अधिकार्‍यांना प्रत्यक्ष भेटून दिले आहे.


लोढा पलावा हेवन भागामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी तथा नदीपात्रांमध्ये तसेच बाजारभागामध्ये जवळपास प्रत्येक दुकानाबाहेर कचर्‍याचे ढिग दिसतात. मनपाची घनकचरा व्यवस्थापनाची गाडी हा कचरा न उचलता आहे त्याच ठिकाणी जाळण्यावर भर देते. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर बी. शामराव यांनी आपल्या शिष्टमंडळासह कल्याण डोंबिवली मनपाच्या ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भरत पवार, आरोग्य अधिकारी डॉ. धोत्रे, जॉनी पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यापर्यंत जनतेची समस्या पत्राद्वारे पोहोचवली. प्रशासनानेदेखील या समस्येवर लवकरात लवकर मार्ग काढण्यात येईल, असा विश्वास बी. शामराव यांना दिला.

लोढा पलावा हेवन भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून कचर्‍याचे व्यवस्थापन योग्यरित्या होत नसल्याचे दिसत होते. परिसरातील अनेक नागरिकांनी यासंदर्भात माझ्या कार्यालयात लेखी तक्रारदेखील दिली होती. मी स्वत: या सगळ्या भागाची पाहणी केल्यावर नागरिकांच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे जाणवले. सध्याच्या कोरोना काळामध्ये आपल्याला अशाप्रकारे अन्य कोणत्याही माध्यमातून नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळणे योग्य असणार नाही. त्यात कचर्‍यामुळे सामाजिक आणि वैयक्तिक आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. म्हणून मी हा विषय प्रामुख्याने हातामध्ये घेऊन मनपाच्या संबंधित अधिकार्‍यांची भेट घेतली आणि त्यांना नागरिकांच्यावतीने म्हणणे मांडले.
– बी. शामराव,
सरचिटणीस, कल्याण डोंबिवली शहर जिल्हा.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
%d bloggers like this: