गोवा 

‘आकाश कंदीलकडे आपली संस्कृती म्हणून पहा’

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात आणि तेही मंदिरात होते. आकाश कंदील म्हणून त्या स्पर्धेकडे पाहू नका ती आपली संस्कृती आहे तिचे जतन कण्यासाठी अश्या स्पर्धेच अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन म्हापसा नगरसेवक वकील तारक आरोलकर यांनी मोरजी सार्वजनिक दुर्गा उत्सव समितीतर्फे पेडणे तालुका मर्यादित आकाश कंदील स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उद्योजक बाबी बागकर, दत्तात्रय देवस्थान अध्यक्ष रंजेश कासकर, रवी हरमलकर, रमेश फडते, संतोष गोवेकर, नागनाथ केरकर दुर्गा उत्सव समितीचे अध्यक्ष सुधीर कानायिक, संतोष कारापूरकर, सोनू शेटगावकर, मनीषा बागकर, श्रुती केरकर, प्रसाद बागकर सतीश च्यारी, परीक्षक सुचिता शिरोडकर, यतीश म्हादळेकर आदी उपस्थित होते.

स्वागत व सूत्रसंचालन सतीश च्यारी यांनी केले. तर अंतरा केरकर, सिमी केरकर, सुजल हरमलकर, आचल, आदींनी पाहुण्याचे गुलाब देवून स्वागत केले.

यावेळी उद्योजक बाबी बागकर यांनी बोलताना श्री दुर्गा उत्सव समितीने अल्पावधीत केलेल्या कार्याला तोड नाही. कोरोना काळात उत्सव  समितीने केलेले कार्य कुणीही विसरू शकत नाही, सामाजिक बांधिलकी ओळखून कार्य करणाऱ्या संस्था समाजाचे दुख ओळखून काम करतात ते लोकांच्या गळ्यातील ताईत बनतात असे बागकर म्हणाले.

उत्सव समितीचे अध्यक्ष सुधीर कान्नायिक यांनी आता पर्यंत केलेल्या कार्याचा   आढावा घेतला.

यावेळी पेडणे तालुका मर्यादित आकाश कंदील स्पर्धेचे विजेते प्रथम विवेक गावडे, यतीन शेट्ये दुसरे, व दुर्वी शेटगावकर याना तिसरे बक्षीस तर तनिष नाईक, उमेश येशी, श्रीरंग मांद्रेकर, विदिशा शेटगावकर,व अविना शेटगावकर याना उत्तजनार्थ बक्षीस देण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: