सातारा 

कराडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा कुटुंबासह मोर्चा 

कराड (अभयकुमार देशमुख) :
एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरुच आहे. सरकारचे लक्ष वेधून घेत आज कराड येथील एसटी कर्मच्या- यानी सहकुटुंब तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला. कर्मचार्‍यांनी शासनाचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करत मोर्चा काढला.

जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण होत नाही, तोपर्यंत संप मागे न घेण्यावर कर्मचारी ठाम आहेत. राज्य शासनाकडून संप मागे घेण्याबाबत वारंवार आवाहन करण्यात येत असतानाही कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांपासून संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू आहे.

दरम्यान या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. राज्यभरात सुरू असलेलं एसटी कामगारांचं आंदोलन चिघळलं असून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही ते आंदोलन मागे घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसून येत आहे.

आज कराड येथील आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत संप सुरुच राहणार असल्याचा इशारा यावेळी या कर्मचाऱ्यांनी दिला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: