क्रीडा-अर्थमत

गोव्याच्या दक्ष नाईकला आयडिया फाउंडेशनचा पुरस्कार

मुंबई :
वोडाफोन आयडिया फाऊंडेशनने बालदिनाचे औचित्य साधून व्हर्च्युअल वोडाफोन आयडिया चिल्ड्रेन्स डे सेलिब्रेशन २०२१चे आयोजन केले होते, ज्यामध्ये शैक्षणिक उत्कृष्टता व अभ्यासाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांमध्ये यश संपादन केल्याबद्दल गुणवान मुलामुलींना सन्मानित करण्यात आले. कानपुर आयआयटीच्या भौतिकशास्त्र विभागाचे पद्म श्री प्रोफेसर हरीश चंद्र वर्मा, व्हीआयएलचे चीफ रेग्युलेटरी आणि कॉर्पोरेट अफेयर्स ऑफिसर आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशनचे संचालक पी बालाजी व वोडाफोन आयडिया फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. निलय रंजन यांनी या विद्यार्थ्यांचा गौरव केला.

या पाच गुणवान विद्यार्थ्यांपैकी एक होता गोव्याचा दहा वर्षांचा दक्ष डी. नाईक! २०१९ आणि २०२१ मध्ये ऑल गोवा स्के मार्शल आर्ट स्टेट लेवल चॅम्पियनशिपमध्ये कॅडेट कॅटेगरी खवनकयमध्ये सुवर्णपदक पटकावून दक्ष नाईकने आपल्यातील मार्शल आर्टस् बद्दलची तीव्र ओढ दाखवून दिलीराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कुटुंबाला व आजूबाजूच्या सर्वांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवावी हे दक्षचे स्वप्न आहे.

वोडाफोन आयडिया फाऊंडेशनने यावेळी सन्मानित केलेले इतर विद्यार्थी:

●       अरुणाचल प्रदेशमधील १५ वर्षांची हिया भारद्वाजपारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन यश मिळवण्यासाठी हिया नेहमीच प्रयत्नशील असते२०२०२१ मध्ये तिने एसजेआर कॉलेज फॉर विमेनने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील निबंध लेखन स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावलाअहमदाबादमधील रामकृष्ण मठ यांनी आयोजित केलेल्या जागतिक वक्तृत्व स्पर्धेत देखील तिला पहिले पारितोषिक मिळाले.

●       तेलंगणामधील नऊ वर्षांची उल्लेन्दू कीर्ती. शेतीसाठी लागणारी उपकरणे दररोज शेतावर घेऊन जाताना आपल्या आईला करावी लागणारी मेहनत पाहून कीर्तीने तांदुळाच्या पोत्यांसारख्या सर्वसाधारणपणे न वापरल्या जाणाऱ्या साहित्यांचा वापर करून एक पिशवी बनवलीकीर्तीच्या या नाविन्यपूर्ण विचारांचा गौरव तेलंगणा सरकारने इन्टिन्ता इनोवेटर एक्झिबिशन २०२१ मध्ये केला होता.

●       उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील प्रियांशी चौधरी. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख उपक्रम असलेला इन्स्पायर पुरस्कार प्रियांशीने जिल्हा स्तरावर जिंकलेला आहे.

●       उत्तराखंडमधील उधम सिंग नगर येथील मानशी कोरंगा. राष्ट्रीय स्तरावर चार वेळा व्हॉलीबॉल खेळलेल्या मानशीचा देखील बालदिनाच्या निमित्ताने वोडाफोन आयडिया फाऊंडेशनने सत्कार केला.

व्हीआयएलचे चीफ रेग्युलेटरी आणि कॉर्पोरेट अफेयर्स ऑफिसर व वोडाफोन आयडिया फाऊंडेशनचे संचालक पी. बालाजी यांनी यावेळी सांगितले, “देशाचे भविष्य आणि उद्याचे नागरिक म्हणजे मुलांचा गौरव करण्यासाठी बालदिन साजरा केला जातो. वोडाफोन आयडिया फाऊंडेशनमध्ये आम्ही शिक्षणाला प्रमुख कार्यक्षेत्र मानून नेहमी त्यावर ध्यान केंद्रित करतो. आपल्या देशातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणारे कार्यक्रम आम्ही विकसित केले आहेत. जिज्ञासा, गुरुशाला आणि शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम यासारख्या आमच्या उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही जवळपास १६ लाखांहून जास्त मुलांवर प्रभाव निर्माण केला आहे आणि आम्ही सातत्याने विस्तार करत आहोत कारण आम्ही असे मानतो की, आपल्या देशातील मुलांचे भविष्य सुधारावे यासाठी आपण जितके जास्त प्रयत्न करू तितके आपले भविष्य अधिक जास्त उज्वल असेल!”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: