गोवा देश-विदेश

‘मी निवृत्त झालेलो नाही…’

पणजी :
अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस चे (एआयटीसी) राष्ट्रीय उपाध्यक्ष लुइझिन्हो फालेरो यांनी आज, ज्यांनी राज्यसभेसाठी त्यांच्या उमेदवारीला ‘निवृत्ती पॅकेज’ म्हटले आहे , अशा टीकाकारांवर जोरदार निशाणा साधला. उमेदवारी दाखल केल्यानंतर गोव्यातील पहिल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना फालेरो म्हणाले की,” मी निवृत्त झालेलो नाही, आणि खरे तर गोव्याचे विशिष्ट प्रश्न राष्ट्रीय स्तरावर, म्हणजे दिल्लीतील संसदेत मांडण्यासाठी हे पाऊल उचलले होते.

फालेरो यांनी त्यांना ही संधी दिल्याबद्दल ‘एआयटीसी’चे  अध्यक्ष  ममता बॅनर्जी यांचे आभार मानले. ते पुढे म्हणाले,की ते तडजोड करणार नाहीत किंवा पोकळ आश्वासनेही देणार नाहीत. गोव्याला गुजरात मॉडेल किंवा बंगाल मॉडेल नको, तर गोव्याचे मॉडेल हवे आहे. गोव्यासाठी काय चांगले आहे हे गोव्यातील जनतेने ठरवले तरच ते घडेल.गोमंतकियांना चांगले प्रशासन मिळावे हे ‘टीएमसी’चे उद्दिष्ट आहे.’’

काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत फालेरो यांनी काँग्रेसवर आरोप केला की, ‘आमदार विकण्याच्या आणि मतांचे विभाजन करण्याच्या घाऊक व्यवसायात गुंतलेला हा पक्ष आहे.

लुइझिन्हो फालेरो यांनीही गोव्याबद्दलच्या त्यांच्या दृष्टीकोनाविषयी सविस्तरपणे सांगितले आणि खाणकाम, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, पर्यावरण यांसारखे मुद्दे त्यांच्या प्राधान्य यादीत असतील, असे नमूद केले.

खाणकामाच्या मुद्द्यावर, लुइझिन्हो फालेरो यांनी स्पष्ट केले की ‘टीएमसी’ शाश्वत आणि कायदेशीर खाणकामाला समर्थन देते, आणि पक्ष कायदेशीर खाणकाम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी लढा देईल..
या पत्रकार परिषदेत  ‘टीएमसी’ चे नेट यतीश नाईक आणि मारियो पिंटो हजर होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: