गोवा देश-विदेश

चंडीगड महानगरपालिकेवर भाजपचा महापौर

'आप'ने दिला काँग्रेसला दोष

पणजी :
चंडीगड महानगरपालिका निवडणुकीत आप ला सर्वाधिक जागा मिळवूनही त्यांना वर्चस्व प्रस्तापित करता आले नाही ऐनवेळी कॉंग्रेस नगरसेवकाने कॉंग्रेसचा हात सोडून भाजप मध्ये प्रवेश केल्याने आप ला धक्का बसला 27 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या चंदीगड महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी त्रिशंकू निकाल दिला, 35 पैकी 14 वॉर्डमध्ये आप तर 12 वॉर्डांवर भाजपने विजय मिळवला.काँग्रेसला आठ तर शिरोमणी अकाली दलाला एका जागेवर समाधान मानावे लागले होते.

आज झालेल्या महापौर निवडी वेळी कॉंग्रेस मतदानापासून दूर राहिले या सगळ्या घडामोडी मुळे आप ने पुन्हाएकदा कॉंग्रेस ने आपले उमेदवार भाजपला विकले असल्याचा रोप केला कॉंग्रेस ला वोट म्हणजे भाजपला वोट असून कॉंग्रेस हि भाजपची बी टीम असल्याचा आरोप या मुळे पुन्हा आम आदमी पक्षाने केला.

नुकतेच कॉंग्रेस च्या नेत्यांनी कॉंग्रेस चे आमदार विकले घेवू जाऊ शकतात पण कॉंग्रेस चे मतदार नाहीत हे विधान केले होते या विधानाचाच संदर्भ घेवून आम आदमी पक्षाने कॉंग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसचे माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा विजय हे काँग्रेस भाजपची बी टीम असल्याचे दर्शवते, असे आपचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक म्हणाले . अशा भामट्यांपासून गोवेकरांनी सावध राहणायचे आवाहन त्यांनी केले.

“जेव्हा जनता काँग्रेसला मत देते, तेव्हा पक्ष आपले उमेदवार भाजपला विकतो. चंदिगड हे त्याचे ताजे उदाहरण आहे. आप बहुमतात आहे, पण काँग्रेसने महापौरपदाच्या निवडणुकीत तोडफोड करण्यासाठी आपला उमेदवार विकला”.अस प्रसारमाध्यमांशी बोलताना नाईक म्हणाले. “आपने 14 जागा जिंकल्या असतानाही भाजपने महापौरपदाच्या लढतीत विजय मिळवला. काँग्रेससोबत राहिलेल्या हरप्रीत कौर बबला यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. शिवाय, काँग्रेसने आधीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. उमेदवार उभा न करून निवडणुकीतून बाहेर पडले आणि सर्व सात नगरसेवकांनी मतदानापासून दूर राहून भाजपचा विजय निश्चित केला अस ते म्हणाले,

“आम्ही राज्यात अशा पक्षांतराच्या घटना गेल्या निवडणुकांमध्ये पाहिल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत, राज्यात पक्षांतरामुळे काँग्रेसला विशेष धक्का बसला आहे. 2017 मध्ये, 40 सदस्यांच्या सभागृहात 17 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. आता ते 2 पर्यंत खाली आले आहे. जुलै 2019 मध्ये मोठ्या पक्षांतरात झाले 10 आमदारांनी काँग्रेस सोडली आणि त्यांच्या फुटलेल्या गटाचे सत्ताधारी भाजपमध्ये विलीनीकरण केले. काँग्रेसला मतदान करणे म्हणजे भाजपला पाठिंबा देणे, हे गोवेकरांना आता स्पष्ट झाले आहे”अस ते पुढे म्हणाले. आप उमेदवार निवडणुकीनंतर पक्ष बदलण्याची शक्यता नाही. उमेदवार निवडणुकीनंतर आप सोडून अन्य पक्षात न जाण्याचे आश्वासन देणारे कायदेशीर शपथपत्रावर स्वाक्षरी करतील,” अस ते पुढे म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: