सातारा 

बजरंग केंजळे यांचा अडेलपणा कायम

७५ वर्षीय नागरिकाचे लाखो रुपयांचे ऊसबिल अडवले

सातारा (महेश पवार) :

कण्हेरखेड विकास सेवा सोसायटीचे जेष्ठ सभासद लक्ष्मण जगदेव शिंदे, वय 75 वर्षे यांचं कोणतंही कर्ज नसताना, सचिव बजरंग केंजळे याने कण्हेरखेड मधील रहिवाशी असलेल्या दत्तात्रय हरिभाऊ शिंदे याच्या तक्रारीचा संदर्भ देत, जरंडेश्वर कारखान्याचे लाखों रुपयांचे बिल अडवल्याची तक्रार लक्ष्मण शिंदे यांनी माध्यमांकडे केली आहे.

सदर बाबतीत लक्ष्मण शिंदे यांनी दोन वेळा जिल्हा बँकेत तोंडी विचारणा केली असता कण्हेरखेड शाखेच्या कर्मचारी सावित्री पवार यांनी तुमची रक्कम सचिवांनी कर्ज खात्यात वर्ग केली आहे असे तोंडी कळवले. सदरच्या उडवाउडवी प्रकरणामुळे व्यथित होतं. कोणतं कर्ज नसताना, आपली कष्टाची रक्कम कोणत्या खात्यात वर्ग केली हे कण्हेरखेड DCC बँक शाखा न सांगू शकल्यामुळं पोलीस अधीक्षक सातारा जिल्हा बँक CEO, GM यांच्यासह रहिमतपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने राष्ट्रमत यांनी केलेल्या चौकशीत खालीलप्रमाणे बाबी उघडकीस आल्या

1) सोसायटीला लक्ष्मण शिंदे यांची रक्कम कापून घ्या सांगणारे मूळ तक्रारदार दत्तात्रय शिंदे, यांनी कोणताच खुलासा करण्यास टाळाटाळ करत असहकार्याची भूमिका घेत बजरंग केंजळे यांना विचारा असे सांगितले.

2) बजरंग केंजळे ह्यांनी मागील संचालक बॉडी व नवीन संचालक बॉडी यांच्या ठरावाप्रमाणे सदर प्रकार केल्याचे कळवले, त्याना सर्व कागदपत्रे, ठराव याची मागणी करता ते जिल्हा बँक DDO किरण माने यांना पाठवले असल्याचे कळवले. DDO किरण माने यांनी सदर गोष्टीचा साफ इन्कार कळवत बजरंग केंजळे खोटं बोलत असल्याची माहिती राष्ट्रमतला दिली.

3) सदर प्रकरणातील ह्या संचालक, सचिव यांच्या संघटित अडवणुकीचं कारण काय याचा शोध घेता लक्षात आले की लक्ष्मण शिंदे, त्यांचं पूर्ण कुटुंब हे सोसायटीमधील भ्रष्टाचार प्रकरणी अनेक प्रकरणे उचलून धरत पारदर्शी कारभाराची मागणी करायचे, ह्याचं सोसायटीने त्यांचे चिरंजीव सचिन शिंदे यांच्या कर्जांची अडवणूक केल्यामुळे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना केलेल्या तक्रारींनंतर कोरेगाव तालुका AR यांनी स्वतः त्यांचं प्रकरण जिल्हा बँकेला कार्यालय सांगत सोसायटी संचालकांना कठोर कार्यवाहीचे निर्देश दिले, पण काहीही कार्यवाही झाली नाही.

लक्ष्मण जगदेव शिंदे यांनी सदर अडवणुकीला जबाबदार सर्व घटकांवर कायदेशीर कार्यवाही घेण्याचा निर्धार केला आहे. एकूणच नितिन पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते यांना कायद्याचा कोणताही धाक नाही, सहकारातील सैल धोरणांचा गैरवापर होत मूळ मालक सभासदांची सेवा तर सोडा, पण त्रास देण्याचा उद्योग अग्रक्रमी होताना चे चित्र दिसत आहे.

या सगळ्या प्रकारानंतर आतातरी बजरंग केंजळेवर कारवाई होणार का ? असा प्रश्न सोसायटीचे सभासद विचारात आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: