गोवा 

मायकल लोबोवरून ‘आप’चा ‘काँग्रेस’वर निशाणा

पणजी :
आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी काँग्रेसवर ताशेरे ओढले ” कॉंग्रेस पक्षाने कळंगुटचे माजी आमदार मायकल लोबो यांना अकार्यक्षम मानले होते मात्र आता त्यांना ते कार्यक्षम वाटत असल्याची टिका त्यांनी केली

“कचरा व्यवस्थापन मंत्री ते कचरा मंत्री, असे म्हणत आधी काँग्रेसने मायकल लोबो यांची खिल्ली उडवली होती, आता काँग्रेसने कचरा मंत्र्यांचा समावेश कोणत्या निकषावर केला आहे असा नाईक यांनी नमूद केल.

“पी. चिदंबरम यांनी सहा महिन्यांपूर्वी गोव्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना वचन दिले होते की, या निवडणुकीत काँग्रेस 80 टक्के नवीन चेहरे आणेल. यावेळी ब्लॉक कमिटी त्यांचा उमेदवार निवडेल. मात्र, काँग्रेसची स्थिती काय आहे, हे आम्हाला माहीत आहे. “आता काँग्रेसने तेच जुने चेहरे आणले आहेत अशी टीका त्यांनी केली

मध्यरात्रीच्या नाटकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपप्रमाणेच काँग्रेसनेही उशिरापर्यंत राजकारण खेळण्यास सुरुवात केली आहे. कळंगुट मतदारसंघातील भाजपचे कळंगुट आमदार मायकल लोबो यांचा पराभव करण्याचा निर्धार काँग्रेस कळंगुट ब्लॉकने यापूर्वी केला होता. त्याच पक्षाने आता एका महिन्याच्या आत लोबो यांना पक्षात घेतले आहे”, अशे ताशेरे त्यांनी ओढले

“भाजप आणि काँग्रेस हे दोघेही गोवेकरांना दर्जेदार रस्ते ,वीज आणि पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरले आहेत आणि त्यासाठी लोकांचा रोष अनुभवत आहेत.अश्या परिस्थितीत ते मतदानपूर्व सेटिंगमध्ये गुंतले आहेत असा टोमणा त्यांनी हाणला

कळंगुट उध्वस्त करणारे लोबो आता शिवोली उध्वस्त करण्याच्या मार्गावर असल्याच कळंगुटचे आप उमेदवार सुदेश मयेकर म्हणाले

“कळंगुट मतदारसंघाचे माजी आमदार मायकल लोबो, जे सध्या शिवोली मध्ये प्रचार करत आहेत, म्हणतात की शिवोली मधील लोकांना मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. मात्र त्यांनी आधी त्यांच्या मतदारांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत.”असा टोमणा मयेकर यांनी हणाला

“काँग्रेस आणि भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांनी कधीही सामान्य लोकांचे जीवन चांगले करण्यासाठी काम केले नाही, मात्र ‘आप’कडे गोव्याच्या विकासाची ब्लू प्रिंट आहे.”अस ते पुढे म्हणाले,

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
%d bloggers like this: