गोवा 

म्हापशातील तरुणांनी केला आपमध्ये प्रवेश

म्हापसा:
माजी खासदार आणि गोव्याचे माजी शिक्षण मंत्री गोपाळराव मयेकर यांचे पुत्र शैलेंद्र मयेकर राजू आवाडकर, केवल नाटेकर, अब्दुल शेख, रिचर्ड ब्रागांझा, पॉल नोरोन्हा, हसन शेख, सदाशिव गोलटेकर, सुधीर नार्वेकर, शेल्डन फर्नांडिस, रोहन माने आणि मेवुल रंकाळे यांनी गुरुवारी पक्षात प्रवेश केला.

म्हांबरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, बुधवारी आम्ही राष्ट्रीय युवा दिन साजरा केला आणि आज म्हापसाच्या तरुणांनी म्हापसाच्या पुनर्बांधणीसाठी पक्षाशी जोडून एक पाऊल पुढे टाकले आहे.

“आज गोव्यातील तरुण जागृत झाले आहेत त्यांना भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी गृहीत धरले . गोव्यातील तरुण हे राज्याचे शक्तीस्थान आहेत. तरुणांची उन्नती ही राज्याच्या प्रगतीइतकीच आहे अस ते म्हणाले

“गोवा सरकारला अलीकडेच खाणकामातील विलंबाबाबत उच्च न्यायालयाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार गोव्यातील तरुणांसाठी नोकऱ्या निर्माण करण्यातही अपयशी ठरले आहे. भाजपचे काही आमदार सरकारी नोकऱ्यांवर त्यांच्या निकटवर्तीयांची मक्तेदारी करत आहेत अस त्यांनी यावेळी नमूद केल

केवळ साखळी, वाळपई आणि पर्ये मतदारसंघात रोजगार मिळत असल्याने गोव्यातील तरुणांना रोजगाराच्या संधीपासून वंचित ठेवले जात असल्याचे म्हांबरे यांनी नमूद केले.

“आपने म्हापसा येथे घरोघरी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे आणि केजरीवाल यांच्या सहा आश्वासनांसह म्हापसेकरांपर्यंत पोहोचत आहे. आम्ही लवकरच एक जाहीरनामा आणू जो विशेषतः म्हापसासाठी असेल अस ते पुढे म्हणाले

“आप’ला म्हापसेकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे आणि घरोघरी जाऊन प्रचार करून आम्हाला हे जाणवले आहे की, यावेळी लोकांना बदल हवा आहे. ‘आप’ची सत्ता येण्यासाठी त्यांचा निर्धार आहे” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: