गोवा 

”त्या’ अनधिकृत बांधकामावर कारवाई होईल अशी आशा’

पणजी :

ओल्ड गोवा वारसास्थळावर उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामांचे मोजमाप करण्यासाठी जुने गोवा पंचायतीने पाऊल उचलल्याने या बांधकामावर कारवाई होईल असा आशावाद निर्माण  झाला आहे, असे आम आदमी पक्षाचे नेते एड .अमित पालेकर म्हणाले

“पंचायत राज कायद्यांतर्गत आवश्यकतेनुसार, जुने गोवा पंचायतीने जुने गोव्याचे सरपंच, सचिव आणि या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या इतर सर्वांच्या उपस्थितीत बेकायदेशीर बांधकामाचे मोजमाप केले आहे”.

“ओल्ड गोवा प्रकारा बाबतीत, निश्चितपणे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, जुने गोवा पंचायत योग्य मार्गावर असल्याचे दिसते आणि हे सकारात्मक असल्याचे ते म्हणाले अस असल तरी जोपर्यंत ही संरचना पाडली जात नाही तोपर्यंत हा मुद्दा पुढे चालू ठेवाला जाईल अस ते पुढे म्हणाला.

“एवढ्या कमी कालावधीत जुन्या गोव्यातील हेरिटेज साईटवर बेकायदा पद्धतीने  बांधकाम करण्यास परवानगी दिल्याचा प्रकार माझ्यासाठी चकित करणारा आहे आणि ही वास्तू त्वरित पाडण्याची गरज आहे”.अस ते पुढे म्हणाले,

“बेकायदा बांधकामांना परवानगी देण्यात ज्या सरकारी विभागांचा सहभाग आहे त्यांना जबाबदार धरले जाणे आवश्यक आहे. सध्या, जुने गोवा पंचायत आपली कायदेशीर जबाबदारी पार पाडत आहे”, ते पुढे म्हणाले.

जुने गोवा पंचायतीच्या सरपंचांनी सांगितले की आज त्यांनी या बेकायदेशीर बांधकामाचे मोजमाप केले आहे आणि 4-5 दिवसांत याबबात  पुढील चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक घेणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: