गोवा 

‘भाजपविरोधी सर्व शक्तींनी युती केली पाहिजे’

पणजी : 
काँग्रेसचे गोवा निवडणूक प्रभारी पी. चिदंबरम यांनी नुकत्याच केलेल्या टिप्पणीमध्ये गोव्यातील लढत फक्त काँग्रेस आणि भाजप यांच्यात असल्याचा दावा केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना, लोकसभा खासदार आणि ‘एआयटीसी’ गोवा प्रभारी महुआ मोईत्रा म्हणाल्या, ‘मला चिदंबरम यांना आठवण करून द्यायची आहे, की काँग्रेस 2017 मध्ये जनादेश जिंकूनही, सरकार स्थापन करण्यात अयशस्वी ठरली. यावेळी देखील काँग्रेस एकटी भाजपला पराभूत करण्यास असमर्थ आहे. तृणमूल सर्व भाजपविरोधी शक्तींना गोव्यात भाजपला हुसकावून लावण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत आहे.

ती पुढे म्हणाली, ‘कोणताही पक्ष (काँग्रेस, आप किंवा ‘टीएमसी’) असा दावा करू शकत नाही, की ते एकमेव भाजप विरोधी पक्ष आहेत. कारण ते सर्व एकाच कारणासाठी येथे रिंगणात उतरले आहेत.

काँग्रेसला 2017 च्या पराभवाची आठवण करून देताना महुआ मोईत्रा यांनी टिका केली, ‘जर ही भाजप आणि काँग्रेसमधील द्विपक्षीय लढत असती, तर काँग्रेस 2017 मध्ये सरकार स्थापन करू शकली असती. काँग्रेसला आता त्यांच्या खचलेल्या मनस्थितीतून आणि ताकदीतून जागे होण्याची वेळ आली आहे.गोव्याच्या लोकांना काय हवे आहे ते लक्षात घ्या.’

moitra

‘टीएमसी’वर काँग्रेस नेत्यांची ‘शिकार’ केल्याचा आरोप केल्याबद्दल महुआ मोईत्रा यांनी काँग्रेसची निंदा केली . त्या म्हणाल्या ,की ‘टीएमसी’ने त्या सर्व काँग्रेसजनांना सामील केले आहे ,ज्यांना भाजपच्या विरोधात लढाईचे व्यासपीठ हवे होते. तिने निदर्शनास आणून दिले की ‘टीएमसी’ सोबत सामील झालेल्या प्रत्येक माजी कॉंग्रेस नेत्याने असे केले आहे ,कारण कॉंग्रेस त्यांना लढाईचे व्यासपीठ देऊ शकत नाही. नुकतेच काँग्रेसमध्ये सामील झालेले भाजपचे माजी आमदार मायकेल लोबो यांचे उदाहरण देत काँग्रेसच्या विधानातील ढोंगीपणा त्यांनी निदर्शनास आणून दिला. “काँग्रेसच्या व्याख्येनुसार, ममता बॅनर्जी आणि जगनमोहन रेड्डी हे देखील ‘पक्षबदलू ‘ आहेत, परंतु हे लोक मुख्यमंत्री म्हणून राज्य चालवत आहेत,” असे त्यांनी नमूद केले.

मोईत्रा यांनी पुनरुच्चार केला ,की गोव्यातून भाजपला हुसकावून लावण्यासाठी भाजपविरोधी मित्रपक्षांसोबत सामील होण्यासाठी ‘टीएमसी’ फुगलेला अहंकार बाळगत नाही. “आम्ही प्रत्येकाला टेबलवर समोरासमोर येऊन बोलण्यासाठी बोलावत आहोत, कारण ही काळाची गरज आहे”.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: