गोवा 

‘…म्हणून सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलल्या’

पणजी: 

विद्यार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल एनएसयूआयचे गोवा अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी गुरुवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि कुलगुरूंवर जोरदार टीका केली आणि म्हणाले की परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणात बहिष्कार घातला जाणार या भीतीने आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याने सरकारने तृतीय वर्षाच्या परीक्षा ७ फेब्रुवारी रोजी पुढे ढकलल्या आहेत.

चौधरी यांनी गुरुवारी पणजी येथे पत्रकार परिषद घेवून  सांगितले की, कुलगुरूंच्या चुकीच्या धोरणामुळे आणि मुख्यमंत्र्यांच्या असंवेदनशीलतेमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.

“हा विजय सर्व विद्यार्थ्यांचा आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांचा. आमच्या एकजुटीने सरकारला परिक्षा पुढे नेण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडले आहे.” असे तो म्हणाला.

चौधरी म्हणाला की गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी कुलगुरूंना ऑनलाइन परीक्षा घेण्याचे निर्देश देऊनही त्यांनी लक्ष दिले नाही.

“कोविडची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे एकतर ऑनलाइन परीक्षा घ्या नाहीतर परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी आम्ही केली होती. पण या सरकारने सुरुवाती पासून आमचे ऐकून घेण्यास नाकारले आणि आता परीक्षेवर मोठ्या प्रमाणावर बहिष्कार टाकला जाणार असल्याचे समजल्यानंतर त्यांनी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.’’ असे चौधरी म्हणाला.

“गेल्या आठवड्यात चर्च स्क्वेअर येथे आमच्या शांततापूर्ण मोर्चा अडवण्यात आला. नंतर आमच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. लाठचार्ज करणाऱ्या पोलिस हवालदारांविरुद्ध आम्ही तक्रार करणार आहोत.” असे तो म्हणाला.

चौधरी म्हणाला की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत एकदम असंवेदनशील आहेत आणि भाजपचा पराभव होणार या भीतीने निवडणूक रणनीती करण्यात व्यस्त आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: