सिनेनामा

‘अनपॉज़्ड: नया सफर’च्या मोशन पोस्टरचे अनावरण

”अनपॉज्ड: नया सफर’ या बहुप्रतिक्षित हिंदी एंथोलॉजीचा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी, अमेझॉन प्राईम व्हिडीओने चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण केले आहे, ज्यामध्ये या एंथोलॉजीच्या पाचही चित्रपटांची स्टार-कास्ट आहे. सुंदर पार्श्वसंगीत असलेले, मोशन पोस्टर तीन तिगडा, द कपल, गोंद के लड्डू, वॉर रूम आणि वैकुंठ या त्यातील पाच ही चित्रपटांची झलक देते. चित्रपटाचा ट्रेलर १५ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘अनपॉज्ड: नया सफर’ अशा पाच अनोख्या कथा आपल्याला दाखवतो ज्या, आशा, सकारात्मकता आणि नवीन सुरुवात याबाबत आहेत. प्रेम, तळमळ, भीती आणि मैत्री यासारख्या कच्च्या मानवी भाव-भावनांचे शब्दचित्र – शिखा माकन (गोंद के लड्डू), रुचिर अरुण (तीन तिगडा), नुपूर अस्थाना (द कपल), अयप्पा केएम (वॉर रूम) आणि नागराज मंजुळे (वैकुंठ) यांसारख्या चित्रपट दिग्दर्शकांनी संवेदनशीलतेने जिवंत केले आहे. भारत आणि 240 देश आणि प्रदेशांमधील सदस्य ‘अनपॉज्ड: नया सफर’ 21 जानेवारी 2022 पासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकतील.

मोशन पोस्टर : https://www.instagram.com/shreyadhan13/tv/CYqWzivJKrg/?utm_medium=copy_link

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: