गोवा 

मनोज परब लढणार दोन मतदारसंघातून

पणजी :
रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब यांना पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. मनोज परब आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत दोन मतदारसंघातून निवडणुक लढवणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे.

मनोज परब यांनी गोवा सुराज पक्षाची साथ सोडत आपला रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष स्थापन केला होता. निवडणूक आयोगाने रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाला फुटबॉलचं चिन्हही दिलं आहे. आता मनोज परब थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वाळपई आणि थिवी या दोन मतदारसंघातून मनोज परब निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान गोवा सुराज पक्षाने रेव्हॉल्युशनरी गोअन्सला मदत करताना त्यांचा छुपा अजेंडा उघड केला नव्हता. मात्र, उमेदवार घोषित करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मर्जीतील काही व्यक्तींना उमेदवारी देण्याचा दबाव आणल्याने त्यांच्याशी असलेले संबंध तोडण्याचा निर्णय घेण्यात आला असे म्हणत मनोज परब यांनी गोवा सुराजचे सर्व आरोप खोडून काढले.

गोवा सुराज पक्षाचे नेते इनासिओ वाझ यांनी निवडणुकीत पाच जागांची मागणी केली होती तसेच दाबोळी येथील मतदारसंघात कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्याविरुद्ध उमेदवार उभा न करण्याची अट घातली होती. त्यांचे दिवसेंदिवस सल्ले देण्याचे सुरू झाल्यावर त्यांना दूर ठेवण्यात आले. मिकी पाशेको यांच्याकडून मदत घेऊन आरजीविरुद्ध ते आरोप करत सुटले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करा किंवा आरोप सिद्ध करा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू असा इशारा मनोज परब यांनी दिला आहे.
..

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: