सातारा 

कण्हेरखेडमध्ये साजरा झाला पानिपत शौर्य दिन 

सातारा :

येथील कण्हेरखेड मध्ये “पानिपत शौर्य दिन” साजरा करण्यात आला. यावेळी सोळा खांबी, चार खांबी स्मारक तसेच बाईजाबाईची छत्री याठिकाणी पुष्पकमल अर्पण करण्यात आले. त्यानंतर ऐतिहासिक राजवाड्यात दिप प्रज्वलन करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या,राजमाता जिजाऊच्या तसेच महादजी शिंदे यांच्या प्रतिमेची पुजा करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. पी. एन. शिंदे उपस्थित होते. तसेच पाटील (कर्नाटक,बिदर), प्रा.चोपडे (तुळजापूर), लहुराज दरेकर, इनामदार,  शेखर शिंदे (सातारा), नेर्लेकर, भरत कदम, अजिंक्य कदम (अपशिंगे) त्याचबरोबर कण्हेरखेडमधील सर्व मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप वाघमारे यांनी केले. सरपंचानी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: