क्रीडा-अर्थमतगोवा 

‘मणिपाल’तर्फे मुलांसाठी लसीकरणला सुरूवात

पणजी :
मणिपाल हॉस्पिटल्स गोव्या तर्फे १५-१८ वर्षे वयोगटातील मुलांना पहिला डोस देण्यासाठी लसीकरण मोहिमेची सुरूवात केली. राज्यातील तरुणांमध्ये आरोग्याच्या समस्या टाळण्याबरोबरच कोविडचा प्रसार टाळण्याच्या हेतूने मणिपाल हॉस्पिटल्स तर्फे या मोहिमेची सुरूवात करण्यात आली आहे.

सरकार कडून कोव्हॅक्सिन लहान मुलांमध्ये वापरण्याची परवानगी देण्यात आली असून मणिपाल हॉस्पिटल्स गोवाकडून सरकारी नियमांचे पालन करून ही लसीकरण मोहिम यशस्वी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या मोहिमेचे आयोजन हे हॉस्पिटलच्या बालरोग विभागात करण्यात येत असून व्यवस्थापन हे प्रशिक्षित अशा लसीकरण अधिकारी, नर्सेस आणि डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

या मोहिमेविषयी बोलतांना मणिपाल हॉस्पिटल्स गोव्याचे कन्सल्टंट पेडिॲट्रिक्स व निओनॅटोलॉजी डॉ. नाथेनियल पिंटो यांनी सांगितले “प्रत्येक व्यक्तीने तसेच त्यांच्या मुलांनी (१५-१८ वर्ष वयोगटातील) कोविड- १९ विरोधी लस घेणे आवश्यक आहे. त्याच बरोबर ही महामारी संपण्याची वाट पाहणे आवश्यक आहे. अशा महामारीत नेहमीच आपल्या सुरक्षेतून दुसर्‍याची सुरक्षा पाहणे आवश्यक आहे. असा दृष्टीकोन ठेवायला हवा.”

मणिपाल हॉस्पिटल्स गोव्यातील हे लसीकरण केंद्र दुपारी २ ते ४ पर्यंत सुरू असून या कालावधीत कोविन पोर्टल वरून नोंदणी करणार्‍या तसेच वॉक इन नोंदणी करणार्‍या लोकांसाठीही लसीकरणाचा पर्याय उपलब्ध आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: