गोवा देश-विदेश

अरविंद केजरीवाल एकदिवसीय गोवा दौऱ्यावर

पणजी :
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज गोव्यात दाखल होणार आहेत. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचा व्हिजन प्लॅन अरविंद केजरीवाल जाहीर करणार आहेत. त्यामुळे आप गोमंतकीयांसाठी काय आश्वासनं देणार याकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलं आहे.

 

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. जाहीरनामे, वचननामे प्रसिद्ध केले जात आहेत. आता आपकडून गोव्यासाठी पुढील पाच वर्षांचा व्हिजन प्लॅन मांडला जाणार आहे. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल स्वत: गोव्यात येऊन हा व्हिजन प्लॅन मांडणार आहेत.

 

गोव्यासाठी याआधी तृणमूल काँग्रेस, रिव्हॉल्यूशनरी गोवन्ससह अनेकांनी आपला जाहीरनामा तयार केला आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांनी आपला अजेंडा जाहीर करायला सुरुवात केली आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल गोव्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. व्हिजन प्लॅन जाहीर केल्यानंतर अरविंद केजरीवाल सांत आंद्रे, कुठ्ठाळी, शिरोडा मतदारसंघात घरोघरी जात प्रचारही करणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: