गोवा 

‘गोव्याचा विकास ठरणार गेमचेंजर’

पणजी :  
भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षांमध्ये गोव्याला स्थीर सरकार दिले आहे. गोव्याचा सर्वांगीण स्वप्नवत विकास केला आहे . हा विकास गोव्यातील मतदारांच्या समोर आहे. आणि तोच विकास भाजपासाठी येत्या निवडणुकीत गेमचेंजर ठरणार असून या विकासाच्या बळावरच भाजपा पुन्हा एकदा बहुमताने जिंकणार आहे. असे प्रतिपादन वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी आज केले.

पणजी येथील भाजपाच्या प्रचार कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत वाहतूक व पंचायत मंत्री असलेले माविन गुदिन्हो बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते व पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ  कुंकळ्येकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना  गुदीन्हो म्हणाले की भाजपाने गेल्या दहा वर्षांमध्ये जी  त्याला सत्ता मिळाली ती लोकांच्या सार्थकी लावली आहे . २०१२  पूर्वीचा गोवा आणि २०१२ नंतरचा गोवा यात जमीन आस्मानाचा फरक  पडला आहे. आणि हा सर्वांगीण विकास भाजपाने केलेला आहे . असे सांगून  २०१४  साली केंद्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर तर गोव्याचा विकासाचा वेग फारच वाढला. आणि त्यामुळे राज्यातील सर्व रस्ते , पूल , ईस्पितळ त्याचबरोबर अनेक विकास प्रकल्प उभे राहिले. असे  गुदीन्हो म्हणाले .

भाजपा या निवडणुकीत विकास कामाच्या बळावर मतदारांना सामोरे जात आहे. इतर पक्ष ते सत्तेवर येणार नाहीत याची माहिती असूनही कधीही पूर्ण न होणारी आश्वासने देत आहेत. तर भाजपाने दिलेली आश्वासने पाळून अनेक योजना लोकांसाठी सुरू केल्या. आणि गोव्याचा विकास केलेला आहे. त्यामुळे गोव्यातील विकास पाहून  मतदार पुन्हा एकदा भाजपाकडे सत्ता सोपवतील यात तिळमात्र शंका नाही. असेही गुदीन्हो याप्रसंगी म्हणाले.

केंद्रीय भाजप सरकारने गोव्यासाठी करोडो रुपयांचे अनुदान दिले. रस्‍ता बांधकाम खात्याचे मंत्री नितिन गडकरी यांनी त्यांच्या एकाच खात्याचे  २२ हजार कोटीचे प्रकल्प गोव्यासाठी दिलेले आहेत. पर्यटन व ईतर खात्यानीही विविध प्रकारचे प्रकल्प उभारण्यासाठी भरीव निधी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षणमंत्री सारखे मोठे पद गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिले . त्याचबरोबर श्रीपाद  नाईक यानाही  केंद्रामध्ये मंत्री केले. केंद्रामध्ये एवढ्याशा गोव्याला  दोन मंत्रिपदे देणारे भाजपाचे एकमेव सरकार असल्याचे माविन गुदिन्हो यांनी यावेळी सांगितले .

भाजपाने गोमंतकीयांचा नेहमीच सन्मान ठेवलेला आहे. आणि गोव्याच्या विकासासाठी काम करताना तळागाळातील लोकापर्यंत विकास पोचवला आहे . काँग्रेसच्या काळात कधीही गोव्याचा सन्मान झालेला नाही काँग्रेसच्या दहा वर्षाच्या केंद्र सरकारच्या काळात गोव्यासाठी एकही मोठा प्रकल्प उभा राहिला नव्हता .  याची आठवण गोवेकरांनी ठेवावी. असे सांगून कोरोना मुळे गेली दोन वर्षे आर्थिक संकट असतानाही भाजप सरकारने सर्व योजना सुरू ठेवल्या. त्याचबरोबर नव्या योजनाही सुरू केल्या.   महिला,  विद्यार्थ्यां,  युवक यांच्या साठी अनेक योजना गोव्यात कार्यरत आहेत . रोजगार दिले. आणि त्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर गोवा आणि स्वयंपूर्ण गोवा हे भाजपाचे  स्वप्न  सत्यात उतरत असल्याचे यावेळी गुदीन्हो यांनी सांगितले.

येत्या काळामध्ये जुवारी पूलमोपा विमानतळ आदी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गोव्याचा  चेहरामोहरा पुर्ण बदलेल व  गोवेकरांचे विकसीत सुंदर गोव्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. असे गुदीन्हो म्हणाले. वाहतूक खात्याअंतर्गत केंद्र सरकारने गोव्याला करोडो रुपयांच्या १००   ईलेक्ट्रिक बसेस प्रदान केलेल्या आहेत .सरकारने गोव्यातील टॅक्सींना मोफत डिजिटल मीटर बसवण्यास सुरुवात केली आहे . त्याचा लाभ गोव्यात पर्यटन वाढीसाठी होणार असल्याचे सांगून पंचायत खात्याने पंचायतींना तांत्रिक कर्मचारी उपलब्ध केल्यामुळे पंचायतींना त्याचा बराच लाभ होत आहे . पंधराव्या आर्थिक आयोगाने गोव्यातील पंचायतीसाठी  ७५ कोटी रुपये अनुदान दिले आहे. ते राज्यातील १९१ पंचायतींना प्राप्त झाल्याचे सांगून पूर्वी कचरा निर्मूलनासाठी फक्त एक लाख रुपये दिले जायचे आता पाच ते सात लाख प्रत्येक पंचायतीला कचरा निर्मूलनासाठी देण्यात येत असल्याचे गुध्दीनो यांनी सांगितले .  या निधी सोबतच गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवानिमित्त जो केंद्र सरकारने ३०० कोटीचा निधी दिला होता त्यातील बराच निधीही राज्यातील पंचायती आणि पालिकासाठी उपलब्ध करून त्यांना पुढील काळामध्ये आर्थिक  लाभ  होईल असे प्रकल्प उभे करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे  गुध्दीनो यांनी सांगितले.


नितीन गडकरी यांनी   दिलेल्या २२ हजार कोटीच्या रस्ता व सलग्न  प्रकल्पामुळे दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा संलग्न झालेला असून चांगल्या रस्त्याबरोबरच व चांगल्या प्रकल्प बरोबरच रस्त्याबाजूचे सुशोभिकरण करण्यात येत असल्यामुळे गोवा एक सुंदर राज्य झाले असल्याचे  गुध्दीनो म्हणाले.  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत  ६० कोटी रुपये खर्च करून ३० पंचायती क्षेत्रामध्ये  विविध प्रकल्प उभारल्याचे सांगून घाण पाणी स्वच्छ करून ते उद्यानांना तथा  गार्डनना वापरण्याचे दोन प्रकल्प गोव्यात उभे राहिल्याची माहिती गुध्दीनो यांनी यावेळी दिली.

दिल्ली आणि पश्चिम बंगालचे पक्ष गोव्यात येऊन मतदारांना विविध आमिषे दाखवत आहेत. मात्र त्या पक्षांच्या नेत्यांनी आपल्या राज्यामध्ये अगोदरच्या या  योजना सुरू कराव्यात त्यानंतरच गोवेकरांना पोकळ आश्वासने द्यावीत. असे सांगून लोकांनी पश्चिम बंगालचे हिंसक राजकारण गोव्यात येऊ देउ नये  त्याचबरोबर दिल्लीमध्ये जो काही सावळागोंधळ चालला  आहे तो गोव्यात नकोच . ही भूमिका गोवेकरांची असणार आहे .असे सांगून यावेळी भाजपला मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहता भाजपा पूर्ण बहुमताने निवडून येईल असे सांगून   विविध पक्षाच्या गठबंधनाचा भाजपवर काही परिणाम होणार नाही  कारण त्यांची गठबंधन ही सत्तेसाठी स्वार्थी हेतूने केलेली आहेत. एका महिन्यापूर्वी हे पक्ष विरोधात होते तेच पक्ष आता सत्तेसाठी गठबंधन करत आहेत. मात्र गोमंतकीय जनता या गठबंधनांना बळी न पडता विकासासाठी व स्थिर सरकारसाठी भाजपालाच मत देईल आणि भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल असे शेवटी  गुदीन्हो यांनी सांगितले.

पाच वर्षे स्थिर सरकार आणि गेमचेंजर विकास हे भाजपाचे बलस्थान आहे.  विकासकामे पाहूनच मतदार मतदान करणार आहेत . हे निश्चित असल्याचे सांगून जे सत्तेवर येऊ शकणार नाही ते दिशाभूल करणारी आश्वासन लोकांना देत आहेत. मात्र गोमंतकीय हुशार असल्यामुळे त्या आश्वासनाला फसणार नाहीत.  तर विकास केलेल्या भाजपाला गोव्याच्या समृद्धीसाठी पुन्हा एकदा मतदान करतील आणि पूर्ण बहुमताने निवडून देतील.
– माविन गुदिन्हो,
परिवहन मंत्री, गोवा 
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: