गोवा 

‘सर्व सरकारी रुग्णालये कोविड केअरसाठी सज्ज ठेवा’

पणजी: 

गोव्यात वाढलेल्या कोविडला असंवेदशील भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेवून सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये कोविड कॅर केंद्रे तयार करण्याची मागणी केली.

‘‘सध्या कोविड प्रकरणे वाढत आहेत. तरीही सरकारची काहीच तयारी नाही. सरकार फक्त गोवा मॅडिकल कॉलेजवर अवलंबून आहे.’’ असे त्यांनी पुढे म्हटले.

युवक काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर यांनी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष जनार्दन भंडारी, युवक काँग्रेसचे सरचिटणीस अर्चित नाईक आणि साईश आरोसकर यांच्या बरोबर पत्रकार परिषद घेवून भाजपवर टिकास्त्र सोडले.

“अत्यंत असंवेदनशील मुख्यमंत्री प्रमोद सावंत भूतकाळापासून शिकण्यात अपयशी ठरले आहेत, त्यांच्यामुळे हजारो रुग्ण कोविडला बळी पडले आहेत. आता पुन्हा तो त्याच चुका करत आहे आणि आतापर्यंत त्याने गॉमेको व्यतिरिक्त इतर कोविड केअर सेंटरची तरतूद केलेली नाही.” असे अ‍ॅड. म्हार्दोळकर म्हणाले.

अ‍ॅड. म्हार्दोळकर म्हणाले की, शेजारील राज्यांमध्ये प्रकरणे वाढत असतानाही मुख्यमंत्र्यांनी पार्ट्या आणि ‘सनबर्न’ उत्सवाला परवानगी दिली. “सध्या सदानंद शेट तानावडे आणि रोहन खवंट यांच्यासह इतर भाजप नेते १५० हून अधिक लोकांसह प्रचार करत आहेत. ते कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन करत आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई झालेली नाही.’’ असे म्हार्दोळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

ते म्हणाले की, काँग्रेस नेते मायकल लोबो, जे कुंभारजुवा येथे पत्रकार परिषद घेत होते, त्यांना फ्लाइंग स्कॉडने रोखले. ‘काँग्रेसवरच कारवाई का? भाजप सरकारी यंत्रणेचा काँग्रेसविरोधात गैरवापर करत आहे.” असे ते म्हणाले.

goa congress

ते म्हणाले की भाजप सरकार खाजगी रुग्णालये आणि खाजगी प्रयोगशाळांवर लक्ष ठेवण्यात अपयशी ठरले आहे जे ॲन्टीजन आणि आरटीपीसीआरसाठी मर्यादित दरापेक्षा जास्त शुल्क आकारत आहेत. “सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा हा भाजपचा नवा घोटाळा असल्याचे सिद्ध होईल.”असे ते म्हणाले.

भाजपच्या अशा कारभारामुळे जनता त्रस्त आहे, अशी खंत जनार्दन भंडारी यांनी व्यक्त केली. “कोविड नियंत्रणात आणण्यात प्रमोद सावंत अपयशी ठरले ओहत आणि आता पुन्हा ते तीच चूक करत आहेत. त्यातच ते आणखी पाच वर्षे सत्ता मिळविण्यासाठी प्रचार करत आहेत. लोकांना त्रास देण्यासाठी त्याला पुन्हा सत्ता हवी का.” असा प्रश्न  भंडारी यांनी केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: