गोवा 

केजरीवालांचा गोव्यात ‘हर घर प्रचार’

पणजी :
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज गोव्यात येऊन आम आदमी पक्षाच्या स्थानिक उमेदवारांच्या प्रचारात सहभाग घेतला. सांत आंद्रे आणि शिरोडा या मतदारसंघात केजरीवाल यांनी घरोघरी प्रचारावर भर दिला.

१४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या नेत्यांसह सांत आंद्रे आणि शिरोडा या मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचार केला यावेळी मतदारसंघातील लोकांचा त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला

केजरीवाल शनिवारी दुपारी गोव्यात दाखल झाले सांत आंद्रे  उमेदवार रामराव वाघ, आप गोवा संयोजक राहुल म्हांबरे आणि आप नेते अमित पालेकर यांच्यासह त्यांनी सांत आंद्रे येथून घरोघरी प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर शनिवारी आम आदमी पक्षाचे उमेदवार महादेव नाईक आणि इतर आप नेत्यांसह शिरोडा येथे घरोघरी प्रचार केला. घरोघरी जाऊन प्रचार करत असताना त्यांनी लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि राज्यात ‘आप’ची सत्ता आल्यावर त्यांचे सर्व प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.

काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर निशाणा साधत केजरीवाल म्हणाले की त्यांनी केवळ त्यांच्या स्वार्थासाठी काम केले आहे. “गोव्यातील तरुणांना सर्वाधिक बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. सरकारी नोकऱ्या फक्त पैसा आणि कनेक्शन असलेल्या लोकांनाच मिळतात. त्यामुळे या वेळी मतदारसंघातील सर्वच लोकांना ‘आप’ला संधी द्यायची आहे.मतदार जुन्या पक्षांना कंटाळले आहेत जे कोट्यवधी रुपयांसाठी पक्ष बदलतात.”अस केजरीवाल म्हणाले

केजरीवाल यांनी आप पक्षाची सत्ता आल्यास गोव्यातील जनतेला प्रामाणिक प्रशासन देण्याच्या वचनाचा पुनरुच्चार केला. अनेक राष्ट्रीय राजकीय पक्ष रिंगणात असताना आपच्या निवडणुकीच्या भवितव्याबद्दल केजरीवाल यांना विचारले असता, मतदारांचा आपवर विश्वास असल्याचे केजरीवाल म्हणाले.

“आप सरकार त्यांचे प्रश्न सोडवेल असे मतदारांना वाटते. मोफत आणि विनाखंडित वीज पुरवठा, बेरोजगारी भत्ता, स्थानिकांसाठी नोकरीत आरक्षण, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक महिलेला दरमहा ₹1000 आणि गृह आधार भत्ता ₹2500 यासह आम्ही जाहीर केलेल्या सर्व हमी पूर्ण केल्या जातील,’ अस ते म्हणाले

सांत  आंद्रे येथील तरुणांनी ‘आप’च्या युवाकेंद्रित धोरणांबद्दल आणि दिल्लीत पक्षाने केलेल्या विकासात्मक कामांबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. ते ‘आप’च्या रोजगार हमीची अपेक्षा करत आहेत. त्यांचा विश्वास आहे की सांत आंद्रेला बदलाची गरज आहे आणि आशा आहे की ते आप  द्वारे घडवून आणले जाऊ शकते.


शिरोडा येथील रहिवाशांनी आप आणि केजरीवाल मॉडेलला पाठिंबा दर्शवला. भाजप सरकारने त्यांना आणि सामान्य गोयंकरांना कसे अपयशी केले आहे हे रहिवाशांनी सांगितले . भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने जाहीर केलेल्या आणि प्रचार केलेल्या योजना ज्यांची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याची सर्वसामान्यांची तक्रार होती. यामुळे मोठ्या प्रमाणात गोव्यात चिंतेचे वातावरण आहे.

तरुणांना नोकऱ्या मिळत नसल्याने बहुजन समाजातही नाराजी आहे. प्रत्येक वेळी भाजपचे नेते बहुजन तरुणांसमोर येतात आणि त्यांना नोकरीची खोटी आश्वासने देतात जी कधीच पूर्ण होत नाहीत. अनेक वर्षांच्या विश्वासघातानंतर, गोवेकरांना हे समजले आहे की केवळ ‘आप’च त्यांना योग्य ते भविष्य देऊ शकते.असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: